Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्याबद्दल खेद व्यक्त केला. "ह्या जागा शिवसेनेने याआधी अनेक वेळा जिंकलेल्या होत्या, तरी त्या सोडाव्या लागल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 19, 2025 | 05:20 PM
Uddhav Thackeray News:  ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray News:  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या समन्वयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने चांगली कामगिरी केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील विलंबामुळे पराभव पत्करावा लागला, आपल्याला चुका दुरुस्त कराव्या लागतील. भविष्यात अशा चुका होत राहिल्या तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही.” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

ज्या चुका विधानसभेत झाल्या, त्या जर पुन्हा झाल्या तर महाविकास आघाडीची प्रासंगिकताच काय राहील? ” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडाव्या लागल्याबद्दल खेद व्यक्त केला. “ह्या जागा शिवसेनेने याआधी अनेक वेळा जिंकलेल्या होत्या, तरी त्या सोडाव्या लागल्या. पण आगामी निवडणुकीत पक्षनिष्ठा आणि ताकदीचा आदर राखला गेला पाहिजे.

Pune News: पुण्यातील ‘मोहम्मदवाडी’चे नामांतर ‘महादेववाडी’ होणार? एकनाथ शिंदे गटाच्या प्रस्तावाने खळबळ उडाली

“लोकसभा निवडणुकीनंतरचा एकत्रित लढ्याचा उत्साह हा विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक अहंकारात रूपांतरित झाला, आणि त्याचा फटका सगळ्यांना बसला,”असे म्हणत ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यापुढे अधिक जबाबदारीने काम करावे, असा संदेश दिला. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. ते म्हणाले  की, “विधानसभा निवडणुकीदरम्यान सवलती जाहीर करण्याच्या शर्यतीत एकमेकांशी स्पर्धा सुरू झाली, ज्याचा फटका संपूर्ण आघाडीला बसला. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. आता पुढील निवडणुकांपूर्वी ही आघाडी स्वतःमधील विसंवाद कसा मिटवते, आणि एकसंघ लढण्यासाठी कोणते धोरण आखते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vijay Vadettiwar: ” अनेकांना आम्हीच मुख्यमंत्री…”; ठाकरेंच्या मुलाखतीवर वडेट्टीवारांचे नेमके विधान काय?

आपल्यालाही आपल्या चुका स्वीकाराव्या लागतील – ठाकरे

उद्धव ठाकरे  म्हणाले की,  निवडणुकीदरम्यान ‘लाडकी बहीण योजने’ सारख्या आश्वासनांमुळे जनतेला गोंधळून गेली होती. पण महाविकास आघाडीचे नुकसान झाले. त्यांनी ईव्हीएम घोटाळा, बनावट मतदार यादी आणि मतदार संख्येत अचानक वाढ यासारख्या मुद्देही नंतर समोर आले.  परंतु केवळ सबबी किंवा कारणे न सांगता तर स्वतःच्या चुकाही स्वीकाराव्या लागतील.” असे ते म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील निकाल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. परंतु पाच महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) दणदणीत विजय मिळवला. विधानसभेतील २८८ जागांपैकी भाजपला १३२, शिंदे गटाच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. त्याच वेळी, विरोधी महाविकास आघाडीला एकूण ४६ जागा मिळाल्या, ज्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला २०, शरद पवार गटाला १६ आणि काँग्रेसला १० जागा मिळाल्या.

Web Title: Then there is no point in staying together uddhav thackerays suggestive statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
1

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका
2

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

Uddhav Thackeray News: ‘मी आज देवेंद्र फडणवीसांना फोन करणार’; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray News: ‘मी आज देवेंद्र फडणवीसांना फोन करणार’; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले
4

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.