औरंगाबाद : शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड करत शिंदे गटाची स्थापना केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झालेत. तर देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर शिंदे गटात नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून शिंदे गटात सामील होण्याचा धडाका सुरुच आहे. मात्र सर्वंच आमदारांना मंत्रिपद मिळणार नाहीय, आणि यावरुन त्यांच्यात वाद होतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.
[read_also content=”अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे पालिकेचं नागरिकांना आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/municipality-appeals-to-citizens-to-vacate-extremely-dangerous-buildings-immediately-304257.html”]
दरम्यान, शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाकडे परततील असं बोललं जात आहे. त्याप्रमाणे, मंत्रिमंडळ (Cabinet Ministery) स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. फक्त मंत्रिमंडळ विस्तार होण्याची वाट आहे, त्यानंतर बंडाळी आमदार आपआपसात वाद करतील असं सुद्धा बोलायला खैरे विसरले नाहीत. तसेच, त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) हा अत्यंत नाटकी माणूस आहे, तो हिंदू-मुस्लिम वाद लावण्यासाठी नाटकं करतो, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. So many MLAs will come to Matoshri and bow their heads, claims Chandrakant Khaire)