विहिरीच्या कठड्याचा स्लॅब कोसळून चार मजूर गाडल्याची भीती
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्याखाली काम करणारे ४ मजूर गाडले गेल्याची घटना घडली आहे . तर गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
भिगवण : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्याखाली काम करणारे ४ मजूर गाडले गेल्याची घटना घडली आहे . तर गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या ठिकाणी आज सकाळी ५ वाजता एन डी आर एफ पथक दाखल झाले असून ढासळलेला भाग पोकलेन मशीनाच्या सहायाने काढून मजुरांचा शोध घेतला जात आहे.
या विहिरीत गाडले गेलेल्या चारही कामगारांच्या नावाची खात्री केली जात आहे.अतिशय गंभीर प्रकरण असल्यामुळे या ठिकाणी एन डी आर एफ च्या पथकाला बोलाविण्यात आले असून पथकाने तातडीने मलबा हटाविण्याचे काम सुरु केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार म्हसोबाची वाडी येथील विजय क्षीरसागर यांच्या शेतात नव्याने बांधण्यात येत असलेल्या विहिरीची रिंग चे काम सुरु असताना सदर प्रकार घडला आहे. रिंगचे काम करणारे कामगार रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनि शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी माजी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मध्यरात्री भेट देत प्रशासनाला शोध कार्यासाठी सूचना करित मदत केली.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील हे स्वतः थांबून आहेत.
घटनास्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त भिगवन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ठेवला आहे. लावण्यात आला आहे.घटनास्थळी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पोकलेन मशीन लावून विहिरीचे ढासळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्या विहिरीत काम करणारे कामगार घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू करून विहिरीच्या ठिकाणी आल्यानंतर घडलेला प्रकार लक्षात आला.
Web Title: There is fear that four laborers have been buried by the collapse of the slab of the well nrab