
कोरेगाव : कुपोषित बालकांना चांगले आरोग्य लाभावे, त्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी हाती घेतलेला पोषण आहार किटचे वितरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. केवळ कोरेगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम हाती घेतला जाईल. एकही बालक कुपोषित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी आयुष्यमान भव: शिबिर झाले. त्याप्रसंगी दरबार उद्योग समुह, आमदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंच, वात्सल्यसिंधू स्वर्गीय सौ. सिंधुताई फत्तेसिंह बर्गे फौंडेशनच्यावतीने शहरातील कुपोषित बालकांना पोषण आहाराच्या किटचे वितरण आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नागरिक व पालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे यांच्याहस्ते फित कापून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चिवटे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुनीलदादा बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, बच्चूशेठ ओसवाल, सचिनभैय्या बर्गे, राजेंद्रबुवा बर्गे, नगरसेवक राहूल रघुनाथ बर्गे, राजेंद्र वैराट, सुरेश कुलकर्णी, सागर दोशी, साहेब युवा मंचचे संस्थापक-अध्यक्ष विजय घोरपडे, बाजार समितीचे संचालक संजय बर्गे, सुनील निदान, बाळासाहेब साळुंखे, माजी संचालक प्रीतम शहा, संतोष बर्गे, बाबा दुबळे, महेश शामराव बर्गे, अर्जुन आवटे, अजित बर्गे, योगेश बर्गे, व मान्यवर उपस्थित होते.
आ. महेश शिंदे पुढे म्हणाले की, संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना चांगल्यातील चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. उपजिल्हा रुग्णालयाची श्रेणी वाढ, खाटांची संख्येत वाढ यासारखे विषय प्राधान्यक्रमाने मार्गी लावले आहेत. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शहरातील कुपोषित बालकांसाठी हाती घेतलेला उपक्रम खरोखरच चांगला आहे, हा उपक्रम पुढे सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजाभाऊ बर्गे म्हणाले की, आमदार महेश शिंदे हे खरोखरच देवदूत आमदार असून, त्यांनी मतदारसंघातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामाची संपूर्ण राज्याने दखल घेतली आहे. एक, दोन नव्हे तर तब्बल चार कोरोना सेंटर्स सुरु करणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कोरेगाव शहरात आरोग्य संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. कुपोषित बालकांना चांगले जीवन जगता यावे, त्यांना आवश्यक असलेले जीवनसत्व मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविला आहे. भविष्यकाळात देखील असेच समाजाभिमुख उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
डॉ. संजय चिवटे म्हणाले की, केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच हातभार असतो. शहरातील सर्व नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून नवनवीन व आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होत आहे. त्यांचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी आमदार महेश शिंदे यांनी धन्वंतरी पूजन केले. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, राजेंद्रबुवा बर्गे, सुरेश कुलकर्णी, आंबेकर, उदयसिंह बर्गे व डॉ. संजय चिवटे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सोनेरी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. निलेश दबडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हणमंत ठोंबरे यांनी आभार मानले.
बलशाली भारत घडविण्यासाठी अभिनव उपक्रम
कोरेगाव शहरातील कुपोषित विनामूल्य किट पुरविण्याचा निर्णय आमदार महेश शिंदे यांनी घेतला आहे. त्यांनी कार्यक्रमस्थळीच कुपोषित बालकांची यादी तात्काळ सादर करण्याचे निर्देश एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले यांच्यासह डॉ. संजय चिवटे व डॉ. हणमंत ठोंबरे यांना दिले. या बालकांना सशक्त होईपर्यंत घरपोहोच पोषण आहार व कडधान्य दरमहा विनामूल्य पोहोच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच बलशाली भारत घडविण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल पालकांनी त्यांना धन्यवाद दिले.
उपजिल्हा रुग्णालयातील सर्वरोग निदान शिबिराची घेतली माहिती
राज्य सरकाच्या आरोग्य विभागाच्या दिशानिर्देशानुसार उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव: शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये डॉ. संजय चिवटे, डॉ. हणमंत ठोंबरे, डॉ. निलेश दबडे, नेत्रचिकित्सा विभागाचे मिलिंद शिंदे यांच्यासह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अश्विनी गावडे-सोनवलकर, डॉ. सायली पाटील, डॉ. जयमाला लाटकर, डॉ. सैफ तांबोळी, डॉ. प्रियांका बाबर, डॉ. त्रिमुखे, डॉ. प्राजक्ता शिंगरे यांनी रुग्णांची तपासणी केली व आवश्यक तो औषधोपचार केले. या शिबिराला आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्यांशी संवाद साधत, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. येणार्या प्रत्येक रुग्णावर वेळीच उपचार झाले पाहिजेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासह आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.