मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात हजारो पोलिस तैनात (फोटो सौजन्य-X)
Thief at Mahayuti Oath-taking Ceremon In Marathi: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. या नव्या सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र असे असतानाही चोरट्यांनी अनेक उपस्थितांना लुटले आहे. काही महिलांसह तेरा जणांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमादरम्यान 11 सोन्याच्या चेन आणि 2 पर्ससह 12.4 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ डिसेंबरच्या संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मुख्यमंत्री, मंत्री, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि देशभरातील हजारो नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ४ महिलांसह ११ जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झालेत. तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.
या कार्यक्रमासाठी मुंबई पोलिसांनी 4,000 जवानांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. अतिरिक्त व्यवस्थेमध्ये SRPF प्लाटून, क्विक रिस्पॉन्स टीम्स (QRT), दंगल नियंत्रण युनिट्स, डेल्टा आणि कॉम्बॅट टीम्स आणि बॉम्ब शोध आणि निकामी पथके (BDDS) यांचा समावेश होता. या कडक उपाययोजना करूनही चोरट्यांनी त्यांचा बेत यशस्वीपणे राबवला.
या कार्यक्रमाची सांगता होताच उपस्थित आझाद मैदान गेट क्रमांक 2 मधून बाहेर पडत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेतला. .गेटमधून बाहेर येत असताना चोरट्यांनी सोन्याची चेन हिसकावून पाकीटे खिशात टाकली.आपले सामान हरवल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक पीडितांनी तक्रार देण्यासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या १३ तक्रारदारांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याची चेन आणि पर्सचा समावेश आहे. ज्याची एकूण किंमत अंदाजे 12.4 लाख रुपये आहे. कार्यक्रमादरम्यान अनेकांचे मोबाईल गायब झाल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्याऐवजी पोलिसांनी फोनवर “हरवले” अशी खूण करणारे प्रमाणपत्र जारी केले आणि तक्रारदारांमध्ये असंतोष निर्माण झाला. या घटनेमुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.