MP Supriya Sule letter to CM Devendra Fadnavis demanding establishment of high court bench in Pune
पुरंदर: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे पीए धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते, यावरून दोघांमध्ये असलेल्या जवळच्या संबंधांची कल्पना येते, त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या पुरंदरमध्ये बोलत होत्या. यापूर्वी, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. बीडमधील हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडली जावी, अशी मागणी मी कालच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंच्या निवेदनावर टीका करताना त्या म्हणाल्या की, त्यांनी नैतिकतेचा विचारही केला नाही. आपल्या पक्षात नेमके काय सुरू आहे, हे त्यांनाच ठाऊक आहे. धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले होते, यावरही सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.
Uday Samant : विधानभवनात उदय सामंतांचा मोबाईल हरवला, दरवेळी सामंतांसोबतच असं का घडतं?
सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची कधीच गाठ पडली नाही, हेच दुर्दैव आहे.” तसेच, वाल्मिक कराड यांचे पीए धनंजय मुंडेंना भेटायला गेले असल्याने त्यांच्या संबंधांची घनिष्ठता स्पष्ट होते. त्यामुळे, धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आमची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
त्याचवेळी, पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची माफी मागितली असून, त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच, “खंडणी, खून, हिंसाचार, शेतकऱ्यांची फसवणूक, अजून काही राहिले आहे का? कोणताही गुन्हा बाकी राहिला आहे का? या घटनेच्या वेळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली, आणि यामुळेच महाराष्ट्राची बदनामी होत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
Nashik Politics: मनमाड बाजार समितीत राजकीय भूकंप; भुजबळ गटाला धक्का
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. लोकांनी विश्वासाने सत्ता दिली, पण कोणताही गुन्हा बाकी ठेवला नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “84 दिवस उलटून गेल्यावर राजीनामा आला, हे व्हिडीओमधील फोटो आहेत. पीडित कुटुंबीयांना काय वाटत असेल? अखेर, नैतिकता सर्वात महत्त्वाची असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.