PM मोदींच्या कार्यक्रमात उदय सामंतांचा मोबाईल हरवला, स्टेजवरून करावं लागलं जाहीर
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज विधानभवनात मोबाईल हरवला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध सुरू आहे. सर्व व्यवस्था सामंताचा मोबाईल शोधण्यासाठी कामाला लागली आहे. विधानभवनाच्या लॉबीसमोरील गर्दी होती. या गर्दीतून त्याचा मोबाईल गायब झाल्याचं सांगितलं जात आहे. याआधीही उदय सामंत यांचा मोबाईल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हरवला होता. त्यावेळी व्यासपीठावरून जाहीर करावं लागलं आहे. त्यामुळे उदय सामंत यांचाच मोबाईल सारखा सारखा का हरवतो, याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
Pune Budget 2025: आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट; कराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
गेल्या सप्टेंबर महिन्यात अशी घटना घडली होती आणि ती पण उदय सामंत यांच्या सोबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला. त्यामुळे व्यासपीठावर काहीकाळ गोंधळाची स्थिती पहायला मिळाली. मोबाईल परत करावा यासाठी थेट व्यासपीठावरून जाहीर करावं लागलं. मात्र काही वेळातच सामंतांचा मोबाईल मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र भर कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समक्ष मोबाईल हरवल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली होती.
Manikrao Kokate : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, नाशिक कोर्टाने दिला निकाल
तर झालं असं की, पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रमादरम्ययान त्यांचा फोन सापडत नसल्याचं त्यांना समजलं. सामंत यांनी कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहिली आणि नंतर आयोजकांनी व्यासपीठावरून जाहीर केलं. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवला आहे. कोणाला सापडला असल्यास त्याने आणून द्यावा असं जाहीर केरण्यात आलं. यानंतर काही वेळातच सामंत यांना त्यांचा फोन मिळाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. उदय सामंत यांनीही देखील मोबाईल सापडला असल्याची माहिती दिली होती.
सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पिय अधिवशेन सुरू आहे. सभागृहात उदय सामंतही उपस्थित होते. यावेळी लॉबीत असलेल्या गर्दीतून त्यांचा मोबाईल गायब झाला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात येत आहे. सरकारी व्यवस्थाही कामाला लागल्या आहेत.