महानगरपालिकेच्या शाळांसाठी बेजतमध्ये तरतूद (फोटो- istockphoto )
नाशिक: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतही मोठा राजकीय बदल पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या निम्म्या संचालकांनी त्यांची साथ सोडून आमदार सुहास कांदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.या घडामोडीमुळे छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून, मनमाडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समितीमधील ही उलथापालथ आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम करू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र असताना, मनमाडमध्येही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या १२ पैकी ६ संचालकांनी त्यांची साथ सोडून शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
या घडामोडीमुळे छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून, बाजार समितीतील सत्ता संतुलन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनमाडमधील या राजकीय घडामोडी भविष्यात आणखी कोणते नवे समीकरण उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात अविश्वास दाखवण्यात आला आहे. भुजबळ गटाचे १२ संचालक असताना, त्यातील ६ संचालकांनी गोगड यांचे अधिकार काढण्याची मागणी उपजिल्हा निबंधकांकडे केली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बाजार समितीच्या सभेत गोगड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी आमदार सुहास कांदे गटातील संचालकांनी केली आहे.
बाजार समितीत एकूण १८ संचालक असून, सध्या आमदार कांदे गटाकडे १० संचालक आहेत. याशिवाय आणखी २ संचालक त्यांच्या गटात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सुहास कांदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ, तर २०२४ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव करून छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला होता. आता बाजार समितीतही त्यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.