
Video: आयटी हब असलेल्या पुण्यात नोकऱ्यांची मारामार; जॉबसाठी हजारो तरूण रांगेत, बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर
पुणे: पुणे शहराला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. दरम्यान सध्याच्या काळात पुणे हे आयटी हब म्हणून ओळखले जातात. पुण्याच्या विविध भागात अनेक अय्तो हब तयार झाले आहेत. देश-विदेशातून हजारो लोक आयटी क्षेत्रात काम करणयासाठी पुण्यात येताना पाहायला मिळतात. पुण्यात मोठ्या आयटीहब निर्माण झाले आहे. अनेक कंपन्या प्लेसमेंट करत असतात. एखादा व्यक्ती सोडून गेला किंवा एखाद्या प्रोजेक्ट साठी कंपनी अनेक जागांसाठी भरती करते. याच संबंधित एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 200 जागांसाठी हजारो तरुण नोकरीसाठी रांगेत उभे आहेत.
पुण्यातील आयटी हब समजल्या जाणाऱ्या एका भागातील एक मोठ्या आयटी कंपनीने काही जागांवर भरतीसाठी जाहिरात काढली. दरम्यान या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी हजारो तरुण तरूणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक तरुण आणि तरूणी यांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. या ठिकाणी तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. साधारण 1 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची ही गर्दी असल्याचे समोर येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आयटी कंपनीने केवळ 200 जागांसाठी मुलाखती ठेवल्या होत्या. मात्र नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
पुणे ,महाराष्ट्र IT कंपनी ने 200 पदों पर नियुक्ति के लिए इश्तहार दिया हजारों इंजीनियर कंपनी के बाहर लाइन लगाकर खड़े हो गए न्यू इंडिया में नौकरियां की भी जरूरत है 🇮🇳 pic.twitter.com/kerP9jdPOQ — Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) January 26, 2025
व्हिडिओ पाहिल्यानंतर आयटी क्षेत्रात देखील बेरोजगारी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयटी सेक्टरमध्ये नोकरी करणयासाठी किती तरी तरूणी तरुण प्रयत्नशील असतात. मात्र हा व्हिडिओ बेरोजगारी निर्माण होत असल्याचे चित्र दर्शवत आहे असे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पुण्याच्या मगरपट्टा भागातील असल्याचे म्हटले जात आहे. मात्र नवराष्ट्र याची पुष्टी करत नाही.
हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महराष्ट्र कॉँग्रेसचे प्रवक्त्र अतुल लोंढे यांनी एक्सवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी 200 जागांसाठी कंपनीने जाहिरात दिली. तर हजारो इंजिनीअर कंपनीच्या बाहेर रांगेत उभे राहीले. नवीन भारतात नोकऱ्यांची देखील आवश्यकता आहे, अशा प्रकारचे ट्वीट अतुल लोंढे यांनी केले आहे. त्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वयंरोजगारात काहीशी घट
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसएसओ) सर्व्हेक्षणात असेही आढळून आले आहे की, देशातील स्वयंरोजगारात गुंतलेल्या लोकांचा वाटा, गेल्या तिमाहीत 40.5 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर घसरला आहे. मागील तिमाहीत पगारदार कामगार आणि अनौपचारिक कामगारांचा वाटा अनुक्रमे 49 टक्के आणि 11 टक्के वाढला आहे. या कालावधीत नियमित कामात महिला कामगारांचा सहभाग 52.3 टक्क्यांवरून 54 टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्रातील कामगारांचा वाटाही ३२ टक्क्यांवरून ३२.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.