Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुकास्तरावरही सुरू होणार असून, स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 08:27 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • तालुकास्तरावरही सुरू होणार मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
  • मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
 

राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कक्षात स्वतंत्रपणे वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्याविषयक सेवा प्रभावीपणे राबविता येणार आहेत.

दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची यंत्रणा आता थेट तालुका स्तरापर्यंत नेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. यासोबत जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्यविषयक समन्वय समित्याही स्थापन होणार आहेत. हा तालुकास्तरावरील कक्ष केवळ खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ मधील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांत स्थापन करण्यात येणार आहे. या तालुक्यांतील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होईल. जिल्हाधिकारी या कक्षात एका स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीला लिपिक व टंकलेखक असतील, तर आवश्यक सुविधा गटविकास अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुरवायच्या आहेत.

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

आधी शासकीय योजना, मग निधीतून मदत

रुग्णांना पात्रतेनुसार आधी आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विभागाच्या योजना व धर्मादाय रुग्णालयांतून उपचार मिळवून दिले जातील. या योजनांसाठी अपात्र ठरणाऱ्या रुग्णांचे अर्ज संलग्न रुग्णालयांमार्फत ऑनलाइन प्रणालीवर मंजुरीसाठी पाठवले जातील. त्यासाठी कक्ष मार्गदर्शन करेल.

कक्ष प्रमुखांनी उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि आशा सेविकांमार्फत गरजू रुग्णांचा शोध घ्यायचा असून, कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी या कक्षावर असेल.

दोन स्तरांवर समित्या

तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार, तर उपविभागीय अधिकारी (महसूल) सहअध्यक्ष असतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इंडियन मेडिकल असोसिएशन व केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य असतील. कक्ष प्रमुख सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, सहअध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. तर, वैद्यकीय क्षेत्रातील दोन समाजसेवक अशासकीय सदस्य म्हणून या समितीचे काम पाहणार आहेत.

आरोग्य तज्ञांची मदत घेणार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल परिषद, स्थानिक वैद्यकीय संघटना, खासगी रूग्णालय येथील आरोग्य तज्ञांची मदत घेणार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आरोग्यशिबीरे आयोजित करून रूग्णांना औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महिन्यातून दोन बैठका बंधनकारक

दोन्ही समित्यांनी महिन्यातून किमान दोन बैठका घ्यायच्या आहेत. दुर्गम, मोठी लोकसंख्या असलेले आणि आरोग्य सुविधांची कमतरता असलेले भाग ओळखून तेथे प्राधान्याने उपाययोजना केल्या जातील. पिण्याच्या पाण्याशी व उष्णतेशी संबंधित आजारांचा आढावा, आरोग्य शिबिरे, फिरती वैद्यकीय पथके आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांचे नियोजन समित्या करतील. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह व रक्तदाबग्रस्तांकडे विशेष लक्ष दिले जाईल.

अहवाल मंत्रालयाकडे

तालुका कक्ष दैनंदिन कामकाजाचा व शिबिरांचा अहवाल जिल्हा कक्षाकडे देईल. जिल्हा कक्ष सर्व तालुक्यांचे अहवाल एकत्र करून मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सादर करेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीची यंत्रणा अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तालुका स्तरावर कक्ष सुरू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्ण वेळेत निदर्शनास येतील आणि त्यांना योग्य उपचार व आर्थिक मदत मिळवून देणे शक्य होईल. आरोग्य योजनांचा लाभ आणि आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत यांचा समन्वय साधला जाईल. कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची दिवाळी लोहारी सावंग्यात! शेतकऱ्यांसोबत साजरा करणार सण; संत्रा उत्पादकांसह ग्रामस्थांना प्रश्न मांडण

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता कुठे सुरू होणार आहे?

    Ans: खरीप हंगाम 2026 मध्ये ट्रिगर-1 अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधील पंचायत समिती कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू केला जाणार आहे.

  • Que: तालुकास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा प्रमुख कोण असेल?

    Ans: संबंधित जिल्हाधिकारी एका स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीसाठी लिपिक आणि टंकलेखक असतील.

  • Que: मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना कोणत्या प्रकारे मदत मिळणार?

    Ans: र्वप्रथम आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विभागाच्या योजना आणि धर्मादाय रुग्णालयांमधून उपचार मिळवून दिले जातील. या योजनांसाठी अपात्र असलेल्या गरजू रुग्णांचे अर्ज मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंजुरीसाठी पाठवले जातील.

Web Title: Cm relief fund cell taluka level devendra fadnavis drought maharashtra vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध
1

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

Washim: ‘व्हीबी- जी राम’जी योजनेत कामांना चालना द्या, जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश; देखरेख समितीची बैठक
2

Washim: ‘व्हीबी- जी राम’जी योजनेत कामांना चालना द्या, जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश; देखरेख समितीची बैठक

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
3

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!
4

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.