Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

Maharashtra Government: पात्र दिव्यांगांना ई-वाहनासाठी कमाल ३ लाख रुपये किंवा ई-बाईकसाठी दीड लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल. हालचालींमध्ये अडचण असलेल्या दिव्यांगांसाठी ई-व्हीलचेअरसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 08:15 PM
दिव्यांगांच्या १६ योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी

दिव्यांगांच्या १६ योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांगांच्या १६ योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी
  • दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती
  • ई-वाहन, डिजिटल साधने, बालसंगोपन, कौशल्य प्रशिक्षणासह सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य
मुंबई/Maharashtra Government: राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी कमाल १ टक्का निधी राखीव ठेवून त्यातून १६ प्रकारच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागांतील पात्र दिव्यांगांना ई-वाहन, ई-बाईक, ई-व्हीलचेअर, (Skill Development) डिजिटल साधने, बालसंगोपन निधी, कौशल्य प्रशिक्षण आणि सुगम्य सुविधांसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. या निर्णयामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अंदाजे २१८ कोटी रुपये उपलब्ध होणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. याबाबतचा (Maharashtra Government) शासन निर्णय जारी झाला आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण, २०१८ यांची प्रभावी अंमलबजावणी करून दिव्यांगांचे सामाजिक समावेशन वाढविण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. २०२५-२६ पासून जिल्हा वार्षिक योजनेतील नियमित योजनांसाठी असलेल्या निधीपैकी कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. हा निधी दिव्यांगांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आवश्यक सेवा, साधने आणि हक्कांची सलग साखळी उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

गतिशीलता आणि डिजिटल सक्षमीकरण

पात्र दिव्यांगांना ई-वाहनासाठी कमाल ३ लाख रुपये किंवा ई-बाईकसाठी दीड लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल. हालचालींमध्ये अडचण असलेल्या दिव्यांगांसाठी ई-व्हीलचेअरसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. या वाहनांच्या खरेदी करारात तीन वर्षांचा देखभाल आणि दुरुस्ती खर्च समाविष्ट असेल. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना टॅब किंवा टॉकिंग लॅपटॉप, तर इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना स्क्रीन रीडर देण्यासाठी कमाल ७५ हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. अंध दिव्यांगांसाठी स्मार्ट ग्लासेस, स्मार्ट केन, लो व्हिजन किट, ब्रेल लर्निंग किट, टॉकिंग वॉच, टॉकिंग कॅल्क्युलेटर, सेन्सरयुक्त चष्मे तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ ट्यूटोरियल्स उपलब्ध करून दिली जातील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत शैक्षणिक संस्थांना डिजिटल शैक्षणिक साहित्य संचासाठी दीड लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल.

दिव्यांगांसाठी विकसित आधुनिक तंत्रज्ञान आणि सहाय्यक उपकरणांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यासाठी दरवर्षी कमाल १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थानिक स्टार्टअप्सना या प्रदर्शनांत उपकरणांचे प्रात्यक्षिक, तांत्रिक सादरीकरण तसेच लाभार्थी आणि शासकीय संस्थांशी संवादाची संधी मिळेल.

एकाच ठिकाणी आवश्यक सेवा

वैश्विक दिव्यांगत्व ओळखपत्र अर्थात यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी तपासणीला येणाऱ्या पात्र व्यक्तीला एकदाच एक हजार रुपयांपर्यंत प्रवास खर्च दिला जाईल. प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर वर्षातून किमान एक विशेष शिबिर आयोजित केले जाईल. या शिबिरात यूडीआयडी कार्ड, बस पास, आरोग्य तपासणी आणि अन्य आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. या शिबिरांसाठी जिल्हानिहाय दरवर्षी कमाल १० लाख रुपये खर्च करता येणार आहे.

दिव्यांगांना यापूर्वी वितरित केलेल्या घरकुलात सुगम्य शौचालय किंवा कमोड बांधकाम, दुरुस्ती आणि अन्य सुगम्यता कामांसाठी एकदाच कमाल २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शासकीय शाळा आणि महाविद्यालयांत दिव्यांग मुला-मुलींसाठी विशेष सुगम्य शौचालये, रॅम्प आणि आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन बांधकामाला अडीच लाख रुपये, तर दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत निधी देता येणार आहे.

Divyang Pension Scheme : दिव्यांग मुलांना जन्मापासून मिळणार पेन्शन! सरकारकडून मोठी घोषणा; कोणाला कसा मिळणार लाभ?

कौशल्य प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत सहाय्य

दिव्यांग विद्यार्थी आणि युवकांना रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत यासाठी अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, दीर्घ मुदतीचे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य शासनमान्य प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल. अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमासाठी २५ हजार रुपये, तर दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम, आयटीआय आणि अन्य शासनमान्य व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत किंवा प्रत्यक्ष खर्च यापैकी कमी रक्कम दिली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिव्यांग व्यक्तींसाठी कोणती कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे?

    Ans: दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी कमाल १ टक्का निधी राखीव ठेवून त्यातून १६ प्रकारच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

  • Que: कौशल्य प्रशिक्षणासाठी किती रुपयांचे सहाय्य केले जाणार आहे.

    Ans: कौशल्य प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांपर्यंत सहाय्य केले जाणार आहे.

Web Title: Maharashtra government decision 16 schemes announced for persons with disabilities tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Financial News
  • Maharashtra Government
  • Skill Development

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
1

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
2

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
3

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ
4

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.