Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Marathwada Water Grid Project :मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती दिली आहे. जपानच्या जायकाकडून २० हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 06, 2026 | 08:59 PM
Marathwada Water Grid Project

Marathwada Water Grid Project

Follow Us
Follow Us:
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती
  • मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे निर्देश
  • प्रकल्पाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश
 

मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून या भागाला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती द्यावी. प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तातडीने अपलोड करून केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी जायकाच्या वरिष्ठ शिष्टमंडळासमवेत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या आराखड्यासह महाराष्ट्र आणि जपान यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) कडून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.

चार जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात लाभ

मराठवाड्यातील पाण्याचे असमान वितरण लक्षात घेता अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांमधून दुष्काळी भागातील धरणांपर्यंत बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविणे हा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी दुहेरी प्रवाहाची व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा समावेश असून जायकवाडी, माजलगाव, मांजरा, उजनी, निम्न तेरणा आणि निम्न मनार ही धरणे परस्परांना जोडण्यात येणार आहेत. सुमारे ३ हजार ९५ किलोमीटर लांबीच्या मुख्य व दुय्यम पाइपलाइन आणि १५ जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सुमारे एक कोटी नागरिकांना थेट लाभ होणार आहे.

२० हजार कोटींच्या कर्जसहाय्याबाबत जायकाचा सकारात्मक प्रतिसाद

संपूर्ण आठ जिल्ह्यांतील वॉटर ग्रीड प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे २५ हजार ५६ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्जसहाय्य देण्याबाबत जायकाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

लातूर आणि धाराशिव हे भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने प्रकल्पाच्या बांधकामात जपानचे प्रगत भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामध्ये डक्टाईल आयर्न पाइप्स, आधुनिक पंपिंग यंत्रणा आणि SCADA प्रणालीचा समावेश असेल. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी, शेंद्रा-बिडकीन आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी जपानी कंपन्या आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत फेब्रुवारीमध्ये मुंबईत ‘मांगा कारवान’ आयोजित करण्यात येणार असून, या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागत केले.

२०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया जायकाच्या सहकार्याने तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. २०२९ पर्यंत प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी तसेच पाणी, वाहतूक, पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांसाठी राज्य शासन जपानसोबतचे सहकार्य अधिक दृढ करणार असून, सर्व प्रकल्पांना शासनाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू नाईक, ‘मित्रा’चे विभाग प्रमुख डॉ. संजय बेलसरे तसेच भारतातील जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो, भारतीय कार्यालयातील जपानचे वाणिज्यदूत केन्जी ताकागी, जायका इंडिया कार्यालयाच्या मुख्य प्रतिनिधी ताकुरो ताकेउची आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात धडक कारवाई! तब्बल ५.२ टन खाद्यपदार्थ ताब्यात तर 559 किलो…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी किती निधी मिळणार आहे?

    Ans: पहिल्या टप्प्यासाठी जपानच्या JICA संस्थेकडून सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या कर्जसहाय्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण आठ जिल्ह्यांतील प्रकल्पाची अंदाजित किंमत २५ हजार ५६ कोटी रुपये आहे.

  • Que: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?

    Ans: छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

  • Que: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे?

    Ans: राज्य सरकारच्या नियोजनानुसार २०२९ पर्यंत या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Web Title: Marathwada water grid project 20000 crore jica funding devendra fadnavis vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • Marathwada

संबंधित बातम्या

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!
1

Mumbai Sanitation Workers Housing Scheme : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मुंबईतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरं!

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
2

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
3

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
4

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.