Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातल्या शेवटच्या टाडा खटल्याचा अखेर लागला निकाल, सुरेश दुबे खून प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

सुरेश दुबेंसाठी 9 ऑक्टोबर 1989 हा काळा दिवस ठरला. सुरेश दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत होते. त्याच वेळी त्यांचा पाठलाग करत असलेल्या सहा ते सात आरोपींनी त्यांना हेरलं आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती.

  • By साधना
Updated On: May 24, 2023 | 05:12 PM
suresh dubey murder case

suresh dubey murder case

Follow Us
Follow Us:

पुणे: बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे (Suresh Dubey Murder Case) यांच्या खून प्रकरणात भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर, यांची पुणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देशातील शेवटच्या टाडा खटल्याचा (Tada Act) निकाल पुणे न्यायालयाने (Pune Court) जाहीर केला आहे. विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावर सुरेश दुबे यांचा 34 वर्षापूर्वी खून करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा हे या प्रकरणाचं कामकाज पाहत होते.

[read_also content=”एम डी ड्रग्ज आणि चरसचा तिने मांडला होता बाजार, कल्याणच्या ‘या’ इराणी ड्रग लेडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/kalyan-khadakpada-police-arrested-irani-drug-lady-from-ambivali-nrsr-403630.html”]

तिघांची निर्दोष मुक्तता
या प्रकरणात आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप सुनावली आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणाचा आज अखेर टाडाचा शेवटचा निकाल लागला आणि तिघांची निर्दोष मुक्तता केली जाणार आहे. भाई ठाकूर यांच्यासह इतरांवर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांनी सुरेश दुबे यांना धमकावल्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकल्याचा देखील आरोप आहे. सुरेश दुबे यांनी जागेचा ताबा सोडावा आणि हफ्ता द्यावा. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी तेव्हा देण्यात आली होती. त्यानंतर जागा रिकामी करुन देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे सुरेश दुबे यांनी वकिलांतर्फे ठाकूर यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर 9 ऑक्टोबर 1989 रोजी बिल्डर दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत असतानाच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

102 साक्षीदार आणि पाच जणांवर टाडा
हे देशातील शेवटचं टाडा प्रकरण होतं. या खटल्यात एकूण 102 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासोबतच पाच जणांवर टाडा खटला चालवण्यात आला. यातील आरोपींना 1992 मध्ये टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. सन 2005 मध्ये या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरु झाली होती.

सुरेश दुबे हत्या प्रकरण
सुरेश दुबेंसाठी 9 ऑक्टोबर 1989 हा काळा दिवस ठरला. सुरेश दुबे रेल्वे स्थानकावर पेपर वाचत होते. त्याच वेळी त्यांचा पाठलाग करत असलेल्या सहा ते सात आरोपींनी त्यांना हेरलं आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आरोपींवर टाडा लावण्यात आला होता. टाडा कायदा (Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act) 1985 ते 1995 दरम्यान लागू होता. पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे सुरक्षा दलांना विशेष विशेषाधिकार देण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता. याच कायद्याचा शेवटच्या खटल्याचा निकाल आज लागला आहे.

Web Title: Three accused acquitted in suresh dubey murder case this is the last case of tada nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 05:10 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • pune court

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.