
अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्...; नागपुरातील घटनेनं खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, घरफोडीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. तरीही त्याने पुन्हा गंभीर गुन्हा केल्याने पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अक्षयचे सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रियांकाच्या १६ वर्षीय भाचीशी प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांपूर्वी अक्षयने अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती. ही बाब मामी प्रियांका यांना समजली. त्यांनी अक्षयच्या वर्तनाला विरोध केला. तसेच त्याचे कृत्य उघड करण्याचा इशाराही दिला होता. यामुळे संतापलेल्या अक्षयने कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाची माहिती मुलीच्या आजीलाही मिळाली. त्यांनी नातीला अक्षयपासून दूर राहण्याची समज दिली होती.
मामीच्या या विरोधामुळेच अक्षयने संतापातून प्रियांकाचे अपहरण करून तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियांका यांना तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Ans: प्रियांका महेश सावरकर (वय ३५, रा. नंदनवन झोपडपट्टी) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर दोन दिवस मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
Ans: आरोपीचे अल्पवयीन मुलीशी असलेले प्रेमसंबंध आणि तिला मारहाण केल्याच्या प्रकाराला मामी प्रियांका यांनी विरोध केला होता. हाच राग मनात धरून आरोपीने हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
Ans: आरोपी अक्षय शालीकराम करोटे (वय ३०) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आधीपासूनच हत्या, घरफोडीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर तो फरार असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.