Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरातील परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू; दोघांना वाचवायला गेला अन् तिसराही बुडाला

धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लाॅईड गेला असताना तोही बुडाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 31, 2024 | 11:08 AM
दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्...

दुर्दैवी ! वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना तरुण नदीत बुडाला; काठावर पाय घसरला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

उत्तूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.29) दुपारी चारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये रोझारीओ अंतोन कुतिन्हो हे वकील, फिलिप अंतोन कुतिन्हो हे आयटी इंजिनिअर तर लॉईड पास्कोन कुतिन्हो हे मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीस होते.

हेदेखील वाचा : Satish Wagh Case: गुप्तांग कापलं, 72 वेळा चाकून भोसकलं; सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

नाताळच्या सणासाठी सर्वजण एकत्र जमले होते. रविवारी दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास ते पोहण्यास गेले होते. धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारीओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लाॅईड गेला असताना तोही बुडाला. बंधाऱ्याच्या काठावर असलेल्या मुलांनी आरडाओरड करताच नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.

दरम्यान, बंधाऱ्याच्या काठावर थांबलेल्या मुलांनी घरामध्ये फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यामुळे परोली बंधाऱ्यावर एकच गर्दी जमली होती. सायंकाळी उशिरा शंतनू पाटील, आश्रम सांबरेकर, निखिल पाचवडेकर, सिद्धेश नाईक, गौरव देशपांडे, असीफ आगा, हसन उर्फ साफा मकानदार यांनी तिघांचेही मृतदेह बंधाराच्या पाण्यातून बाहेर काढले. यावेळी मोठी गर्दी जमली होती. कुतिन्हो कुटुंबियांनी केलेला आक्रोश एकच पिळवटून टाकणारा होता.

रायगडमध्ये चौघांचा बुडून मृत्यू

रायगड माणगाव येथेही नुकतीच दुर्दैवी घटना घडली होती. रायगडच्या रवाळजे गावात दु:खद घटना घडली होती. गावातील कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्यांचा नदीवर गेले असताना तेथे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बुडालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. बचाव पथकाला दोघांचे मृतदेह सापडले असून, अद्याप दोन मृतदेहांचा शोध  घेतला जात आहे.

हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: ‘सीआयडी’च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे; वाल्मिक कराडची 100 हून अधिक…

Web Title: Three people died after drowning in paroli dam in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
1

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी
2

Kolhapur : जयसिंगपूरमध्य़े आघाडीचा उमेदवार ठरला; निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
3

Kolhapur News : महायुतीत ‘नाराजीनाट्य’नगराध्यक्षपदासाठी सात जागेवर भाजपाचा दावा; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या
4

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.