आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
02 Oct 2025 02:45 PM (IST)
Pankaja Munde Dasara Melava Live : बीड : विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात मेळावे सुरु आहेत.अनेक राजकीय नेते विचारांचे सोने लुटत असून समर्थकांना संबोधित करत आहेत. भगवानबाबा गडावर या वर्षी देखील भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सुरु ठेवली आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे असल्याचे स्पष्ट केले.
02 Oct 2025 02:40 PM (IST)
Elon Musk Marathi News: टेस्लाचे मालक एलोन मस्क हे ५०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, बुधवारी (१ ऑक्टोबर) अमेरिकन बाजार बंद झाले तेव्हा एलोन मस्कची एकूण संपत्ती ५०० अब्ज डॉलर्स (४४.३३ लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली. काल टेस्लाच्या शेअरमध्ये ३.३१% वाढ झाली, ज्यामुळे मस्कच्या एकूण संपत्तीत वाढ झाली. तथापि, मस्कची सध्याची एकूण संपत्ती $४९९.१ अब्ज (₹४३.९९ लाख कोटी) आहे. गेल्या १० वर्षांत मस्कची संपत्ती ३४ पटीने वाढली आहे.
02 Oct 2025 02:35 PM (IST)
बिग बॉस १९ मध्ये, स्पर्धक नवीन कॅप्टन बनण्यासाठी घरात स्पर्धकांमध्ये टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये शाहबाज, बसीर अली, प्रणीत मोरे आणि अभिषेक बजाज एकमेकांशी वाद घालताना दिसले आहेत. विशेषतः अभिषेक बजाजने शाहबाजवर जोरदार टीका केली आहे. ‘बिग बॉस’ ने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये कॅप्टनसी टास्क पार पडला आहे.
02 Oct 2025 02:33 PM (IST)
India vs West Indies first innings : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. इंग्लडविरुद्ध दमदार कसोटी मालिकेनंतर आता भारत वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये वेस्टइंडीज संघाला 162 धावांवर गुंडाळल आहे. 44.1 ओवरमध्ये भारताच्या संघाने वेस्टइंडीज च्या सर्व फलंदाजांना बाद करून दुसऱ्याच सेशनमध्ये पहिला डावाचा वेस्टइंडीजचा खेळ संपवला आहे.
02 Oct 2025 02:30 PM (IST)
Israel Hamas War : सोमवारी (२९ सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास युद्ध संपवण्यासाठी प्रस्ताव मानला होता. या प्रस्तावाला इस्रायलने पाठिंबा दिला होता. तर हमासने यावर विचार करावा लागेल असे म्हटले होते. यामुळे हमासला ट्रम्प यांनी प्रस्तावावर प्रतिसाद देण्यासाठी तीन-चार दिवसांची मुदत दिली होती. तसेच त्यांनी योजना अंमलात आली नाही, तर याचे गंभीर परिणा भोगावे लागतील असे म्हटले होते. दरम्यान हमासकडून ट्रम्प यांच्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद येण्यापूर्वी गाझात मोठी खळबळ उडाली आहे.
02 Oct 2025 02:26 PM (IST)
शुभमन गिल डॉन ब्रॅडमनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याचे उद्दिष्ट ठेवतो: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात डॉन ब्रॅडमनच्या प्रमुख विक्रमाशी बरोबरी करण्याची नामी संधी चालून आली आहे.
02 Oct 2025 01:55 PM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. संघाच्या शाखेला आज विजयादशमीच्या मुहूर्तावर 100 वर्षे पूर्ण होत आहेत. 1925 साली डॉ. केशव हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती. भाजप पक्षातील बहुतांशी नेत्यांना संघाचे बाळकडू मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ प्रचारक म्हणून देखील काम केले आहेत. संघ शताब्दीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी संघकार्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
02 Oct 2025 01:40 PM (IST)
बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेता सलमान खाननंतर अभिनेता कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. मध्यंतरी अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर देखील गोळीबार झाला. त्याचबरोबर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारूकी याला काही दिवसांआधी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुनव्वरची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. यानंतर मुनव्वरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान मुन्नवरच्या जीवावर उठलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
02 Oct 2025 01:35 PM (IST)
विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनांकडून मेळावे घेतले जातात. त्यात राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेली दसऱ्याच्या सिमोल्लंघनाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ही परंपरा श्रद्धा व निष्ठेने जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही परंपरा सुरू ठेवली आहे. श्वासात श्वास असेपर्यंत आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, असा निर्धार मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.
02 Oct 2025 01:25 PM (IST)
आशिया कप फायनल मध्ये भारताच्या संघाला ट्रॉफी न दिल्यामुळे मोठा वाद पाहायला मिळाला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्की हे भारतीय संघाला ट्रॉफी देणार होते पण पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या भारत पाकिस्तान वादामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी न देता ती तशीच घेऊन गेले. त्यानंतर सोशल मीडियावर हा वाद आणखीनच पेटला होता एवढेच नव्हे तर यासंदर्भात क्रिकेट असोसिएशनची बैठक देखील पार पडली.
02 Oct 2025 01:15 PM (IST)
गोपीचंद हिंदुजा आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) म्हणून उदयास आले आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ₹१.८५ लाख कोटी आहे. त्यांच्या मागे स्टील टायकून एलएन मित्तल आणि त्यांचे कुटुंब आहे, ज्यांची संपत्ती अंदाजे ₹१.७५ लाख कोटी आहे. हे भारतीय उद्योजकांच्या जागतिक प्रभावाचे प्रतिबिंब आहे. धातू, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि किरकोळ क्षेत्रातील भारतीय वंशाचे व्यवसाय लंडनपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत आपली उपस्थिती प्रस्थापित करत आहेत.
02 Oct 2025 01:03 PM (IST)
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन 1961 मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील 11 राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.
02 Oct 2025 01:01 PM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सेशनमध्ये कमालीची कामगिरी केली. या सामन्यात वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेस याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिके नंतर भारताचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या दुसऱ्या मालिकेकडे वळला आहे. भारताच्या संघासाठी ही मालिका देखील फार महत्वाची असणार आहे.
02 Oct 2025 01:00 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे उड्डाणपुलाखाली रिक्षाचालक इमरान शेखची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिस सीसीटीव्ही तपासून शोध घेत आहेत, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
02 Oct 2025 12:50 PM (IST)
राजस्थानातील किशनगडमध्ये फसवणुकीची घटना घडल्याचे समोर आले आहे. दलालाने २ लाख घेऊन लग्न लावून दिल होत. नंतर नवरीने सुहागरात्रीच्या दिवशी अट ठेवली. दुसऱ्या दिवशी रोकड-दागिने घेऊन फरार झाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल.
02 Oct 2025 12:40 PM (IST)
डोंबिवली येथून एक मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून १०० हुन अधिक सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ (Phoenix Investment) प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपी फरार आहे त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
02 Oct 2025 12:30 PM (IST)
पुण्यातील गुंड निलेश घायवळने खोटा पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवून स्वित्झर्लंडला पळाला. पोलिसांनी त्याच्या बँक खाती गोठवली असून, संपत्तीचा शोध पोलीस करत आहे.
02 Oct 2025 12:20 PM (IST)
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना जामीन मिळाला आहे.
02 Oct 2025 12:10 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुरड्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पाच कोटींच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे. आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या आणि कलम 364 म्हणजे पैशासाठी अपहरण या कलमांतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. आणि मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
02 Oct 2025 11:49 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच स्थापना 1925 साली डॉ. हेडगेवार यांनी केली होती. आज संघाला 100 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने रेशीमबाग येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोंविद हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले असून हजारो स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला
02 Oct 2025 11:47 AM (IST)
"शाखा उपक्रमांमध्ये नियमित सहभाग घेऊन, स्वयंसेवक त्याचे व्यक्तित्व (व्यक्तिमत्व), कर्तृत्व (कर्तेत्व), नेत्रत्व (नेतृत्व), समाजदारी (ज्ञान) आणि भक्ती (भक्ती) विकसित करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी संघशताब्दी कार्यक्रमातून व्यक्त केल्या.
"Through regular participation in Shakha activities, a swayamsevak develops his vyaktitv (Personality), kartrutv ( doership), netrutv (Leadership), Samajhdaari ( Wisdom ) & Bhakti (Devotion)."- Dr Mohan ji Bhagwat. #RSS100Years https://t.co/UIbKUnFt6A pic.twitter.com/Fiq2MnLYJ7
— RSS (@RSSorg) October 2, 2025
02 Oct 2025 11:46 AM (IST)
"आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे, त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळाले. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजानी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवेकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्ती हे सगळे मिळू आपले राष्ट्रीयत्व तयार होतं," अशा भावना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शताब्दीवर्षानिमित्त व्यक्त केल्या आहेत.
02 Oct 2025 11:22 AM (IST)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अहिंसेची लढाई लढणारे महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. गांधीचे विचार आणि त्यांची जीवनशैली आजही जगाला प्रेरणा देतात. गांधीजींना आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले होते. उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीश सरकरापुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी केली जात आहे.
02 Oct 2025 10:54 AM (IST)
बिग बॉसच्या फॅन पेज “बिग बॉस तक” नुसार, घरातील कॅप्टनसी टास्क रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर, बिग बॉसने घोषणा केली की कॅप्टनसी टास्क रद्द झाल्यामुळे, या आठवड्यातही घराचा सध्याचा कॅप्टन कॅप्टन असेल. याचा अर्थ फरहाना भट्ट पुन्हा एकदा घराची कॅप्टन बनली आहे. फरहाना ही या हंगामात सलग दोनदा कॅप्टनशिप सांभाळणारी पहिली स्पर्धक आहे.
02 Oct 2025 10:43 AM (IST)
२ ऑक्टोबर, गांधी जयंती आणि दसरा या दिवशी अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, ज्यामुळे मोठी टक्कर झाली. चाहते दोन्ही चित्रपटांवर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर १” प्रेक्षकांमध्ये लक्षणीय चर्चा निर्माण करत असताना, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” देखील मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळवत आहे. चित्रपटाची कथाच नाही तर दोन्ही स्टार्समधील केमिस्ट्री देखील मने जिंकत आहे. तर, चित्रपटाच्या कामगिरीवर आणि त्याला खास बनवणाऱ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
02 Oct 2025 10:34 AM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या हाती चौथी विकेट पहिल्या सेशनमध्ये लागले आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या सेशनमध्ये विकेटचे हॅट्रिक घेतले आहे. मोहम्मद सिराज में या सामन्यात पहिल्या सेशनमध्ये वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
02 Oct 2025 10:32 AM (IST)
राज्यात एकनाथ खडसे यांच्या जावयांना अटक केल्यानंतर खडसे परिवारावर आरोप करण्यात येत होते . प्रांजल खेवलकर यांना कथित ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. खराडीतील एका खाजगी ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ड्रग्सच सेवन केल्याच्या आरोपाखाली प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना अटक केली होती . मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे . प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सच सेवन केल नसल्याचं समोर आल आहे .
02 Oct 2025 10:23 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मोठा धक्का बसला आहे. युएईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीग टी२० (ILT20) च्या चौथ्या हंगामाच्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. $१२०,००० च्या मूळ किमतीसह अश्विन लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यासाठी बोली लावण्यात रस दाखवला नाही. जर त्याला संघ मिळाला असता तर तो या लीगमध्ये खेळणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू बनला असता.
02 Oct 2025 10:14 AM (IST)
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायल गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहे. हमासचा संपूर्ण नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच इस्त्रायलने घेतली आहे. इस्त्रायले केवळ हमास नव्हे तर फिलीस्तीनसह अन्य काही देशांवर देखील हल्ले केले आहेत. आता थेट इस्त्रायलने आणखी एक देशाला इशारा दिला आहे.
02 Oct 2025 10:05 AM (IST)
भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आता हा वाद महिला क्रिकेटमध्ये देखील पहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे पुरुष संघाने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता, त्याचप्रमाणे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघही तेच करेल. म्हणजे, हस्तांदोलन होणार नाही, फोटोशूट होणार नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी कोणताही संवाद होणार नाही.
02 Oct 2025 10:00 AM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुरड्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पाच कोटींच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे.
02 Oct 2025 09:59 AM (IST)
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायल गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहे. हमासचा संपूर्ण नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच इस्त्रायलने घेतली आहे. इस्त्रायले केवळ हमास नव्हे तर फिलीस्तीनसह अन्य काही देशांवर देखील हल्ले केले आहेत. आता थेट इस्त्रायलने आणखी एक देशाला इशारा दिला आहे.
02 Oct 2025 09:55 AM (IST)
पुण्यातील गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निलेश घायवळवर गंभीर गुन्हे असताना त्याने खोटा पत्ता देत पासपोर्ट मिळवला आणि थेट स्वित्झर्लंडला पळाला. घायवळ गँगच्या गुंडांनी काही कारण नसताना आम्ही इथले भाई आहोत म्हणत सामान्य नागरिकावर गोळीबार केला तर एकावर कोयता हल्ला करण्यात आला. मात्र या घटनेने निलेश घायवळचा पाय खोलात गेला.
Marathi Breaking Live Updates : विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हाने, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभुतपूर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले.