Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. 3, 4, 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले असून, या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 25, 2022 | 08:33 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन तसेच बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

[read_also content=”कामाची बातमी! मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, २९ नोव्हेंबरला ‘या विभागात’ पाणी पुरवठा बंद https://www.navarashtra.com/maharashtra/water-will-not-come-to-this-section-on-november-twenty-nine-november-in-mumbai-348356.html”]

मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. 3, 4, 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले असून, या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हा सर्कीट बनवण्यात आला आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले. पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने दि.6 डिसेंबर, 2022 रोजी चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्कीट पर्यटन संचालनालय, मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्ह्यात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’च्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी येथे करण्यात येणार आहे.

Web Title: Tour circuit based on the life of babasaheb ambedkar and buddhist caves will be inaugurated tomorrow mangalprabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 08:33 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • caves
  • Mangalprabhat Lodha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.