Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर बसस्थानकाला परिवहनमंत्र्यांची अचानक भेट; आगार व्यवस्थापकाला थेट निलंबितच केलं

विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 08:04 AM
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (दि.२८) सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शौचालय, पाणपोईसारख्या सर्वसामान्य प्रवासी सेवेचा आढावा घेतला. यात प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छ असल्याचे त्यांना आढळून आले.

हेदेखील वाचा : Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

दरम्यान, पाणपोईच्या पाच नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता. याबाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले.

प्रवाशांच्या सुविधांमध्ये त्रुटी

विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम देखील भरला होता. परंतु, सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत.

राज्यातील इतर आगारप्रमुखांनाही सल्लावजा इशारा

राज्यातील एसटीच्या 251 आगारप्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पाहावे आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.

हेदेखील वाचा : Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Web Title: Transport ministers surprise visit to solapur bus stand suspend depot manager

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Maharashtra ST Buses
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
1

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
2

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
3

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
4

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.