Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद; सिंहस्थ कुंभमेळ्याआधी प्रशासनाचा निर्णय

Trimbakeshwar Temple Nashik will be closed for Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि गर्दी नियोजन केले जाणार असल्याने, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 01:13 AM
Trimbakeshwar Temple Nashik

Trimbakeshwar Temple Nashik

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद
  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
  • मंदिरातील नित्यपूजा, आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहणार
नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाबत मोठा निर्णय घेण्यात येत आहे. संभाव्य नियोजनानुसार येत्या १५ किंवा १६ ऑक्टोबरपासून त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार हे नियोजन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

विकासकामे आणि गर्दीचे नियोजन, १२ ऑक्टोबरपर्यंत VIP दर्शनावर बंदी

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे काम सुरू असताना मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे अपघात किंवा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी मंदिर काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या पितृपक्षामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी होत आहे. तसेच, शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी तसेच,  भाविकांना दर्शन घेतला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

मंदिर बंद  तरी नित्यपूजा सुरूच राहणार

भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार बंद असले तरी श्री त्र्यंबकेश्वराची धार्मिक परंपरा मात्र खंडित होणार नसल्याचे सांगितले जात आहे.  मंदिरातील नित्यपूजा, त्रिकाल पूजा तसेच इतर पारंपरिक धार्मिक विधी हे  नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नसले, तरी मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी नियमितपणे पार पडणार आहेत. तसेच, मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख आणि कालावधी याबाबत देवस्थान ट्रस्टकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना मिळणार वेग

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे प्रस्तावित आहेत. रस्ते विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कामांना या काळात वेग देण्यात येणार आहे.मंदिर काही काळ भाविकांसाठी बंद असल्याने विकासकामे आणि आवश्यक नियोजन अधिक सुरक्षितपणे करता येणार असल्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची तयारी करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Web Title: Trimbakeshwar temple nashik closed ahead of kumbh mela 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:50 AM

Topics:  

  • girish mahajan
  • Trimbakeshwar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.