Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष

त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्षपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून संस्थानचे सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि विश्वस्त अमर ठोंबरे यांच्यात नाशिक महापालिका आवारात शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 21, 2026 | 08:42 PM
tryambakeshwar-sant-nivruttinath-maharaj-sansthan-trustees-dispute-president-post

tryambakeshwar-sant-nivruttinath-maharaj-sansthan-trustees-dispute-president-post

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानात वाद
  • अध्यक्षपदावरून विश्वस्तांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर
  • अध्यक्षपद रिक्त असल्याने कामकाजावर आणि यात्रेच्या नियोजनावर त्याचा परिणाम
Nashik News : त्र्यंबकेश्वर नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्षपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने संस्थानमधील नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन दोन विश्वस्तांमध्ये सार्वजनिक ठिकाणी शाब्दिक चकमक झाल्याचा प्रकार गुरुवारी दि. (१९) नाशिक महापालिकेच्या आवारात घडला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात खळबळ उडाली असून संस्थानमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

सातपूर येथील जलकुंभाला संत निवृत्तीनाथ महाराज यांचे नाव देण्याच्या संदर्भात महापालिकेचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी संस्थानच्या काही विश्वस्तांना गुरुवारी महापालिकेत बोलावले होते. या वेळी संस्थानचे सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि विश्वस्त अमर ठोंबरे यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते. बैठकीनंतर तळमजल्यावर अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात चर्चा सुरू झाली.

मात्र, या चर्चेदरम्यान मतभेद निर्माण होऊन कुलकर्णी आणि ठोंबरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसान हमरीतुमरीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित

त्र्यंबकेश्वर येथील यात्रेच्या नियोजनाची चिंता

सचिव श्रीपाद कुलकर्णी यांनी अमर ठोबरे यांच्या दिशेने आक्रमकपणे आगेकूच केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संस्थानचे माजी अध्यक्ष नीलेश गाढवे आणि महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत झाला. दरम्यान, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा २ फेब्रुवारी रोजी होणार असून यात्रेचा कालावधी जवळ येत असताना संस्थानमधील विश्वस्तांमधील मतभेद उघड झाल्याने वारकरी वर्गातून चिता व्यक्त केली जात आहे. यात्रेच्या नियोजनासाठी संस्थानमध्ये समन्वय आणि एकमत असणे आवश्यक असल्याचे मत वारकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

संस्थानच्या अध्यक्षपद रिक्त असल्याने कामकाजावर आणि यात्रेच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी काही वारकऱ्यांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे वारकरी संप्रदायासह भाविकांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्षपद किती काळापासून रिक्त आहे?

    Ans: संस्थानचे अध्यक्षपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे.

  • Que: संस्थानच्या विश्वस्तांमध्ये वाद कशावरून झाला?

    Ans: अध्यक्षपदाच्या निवडीवरून सचिव श्रीपाद कुलकर्णी आणि विश्वस्त अमर ठोंबरे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.

  • Que: संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा कधी होणार आहे?

    Ans: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर संस्थानमधील अंतर्गत मतभेद चर्चेत आले आहेत.

Web Title: Sant nivruttinath sansthan president dispute warkaris await charity by commissioner nashik news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Nashik Latest News
  • Nashik News
  • Trimbakeshwar

संबंधित बातम्या

शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय
1

शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!
3

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.