Beaten to Farmer
पुणे : चेष्टा केल्याने झालेल्या वादातून टोळक्याने भावंडांवरर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आदित्य बर्डे आणि त्याचा भाऊ ऋषी (दोघे रा. संतोषनगर, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आदित्य विशाल गोसावी (वय २०, गोसावी अपार्टमेंट, श्रीनगर सोसायटी, धनकवडी), राज राकेश परदेशी (वय २३, रा. त्रिमूर्ती चौक, धनकवडी), ओंकार चंद्रकांत सावंत (वय १८, रा. म्हसोबा चौक, धनकवडी) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बर्डे यांनी एका अल्पवयीन मुलाची चेष्ट केली होती. चेष्टा केल्याने त्यांच्यात वाद झाला होता. आदित्य, त्याचा भाऊ ऋषी, मित्र केतन कोंढरे, हर्षल खिलारे भारती विद्यापीठ परिसरातील वेलनेस मेडीकल दुकानाजवळ गप्पा मारत थांबले होते.
त्या वेळी आरोपींनी आदित्य आणि त्याचा भाऊ ऋषी याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन अल्पवयीन मुलगा, त्याचे साथीदार आदित्य, राज, ओंकार पसार झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपास करुन चौघांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. घावटे तपास करत आहेत.