Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! खाद्य तेलाच्या भेसळीवर तुकाराम मुंढेंचा दणका; आता सुट्टे तेल विकता येणार नाही, एक्सपायर्ड तेलाच्या रिपॅकिंगवर कारवाई

दूध आणि इतर खाद्यपदार्थांनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्य तेलातील भेसळीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. सुटे तेल विक्री, मोहरी तेलातील अनधिकृत मिश्रण आणि एक्सपायर्ड तेलाचे रिपॅकिंग यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 08:29 PM
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:

मुंबई : दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधातील कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने खाद्य तेलाकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्य तेलाच्या दर्जाची तपासणी आणि नियमांचे पालन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

खाद्य तेलाच्या मानकांची तपासणी सुरू असताना काही ठिकाणी अनियमितता आणि कथित भेसळीचे प्रकार आढळल्याचे मुंढे यांनी सांगितले. काही नोंदणी नसलेल्या खाद्य तेल उत्पादकांचा शोध लागला असून, मोहरीच्या तेलात अनधिकृत मिश्रण केल्याचेही निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग केल्याचे प्रकारही आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

खाद्य तेलाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीला नियम लागू होणार आहेत. उत्पादक, किराणा दुकानदार, ऑनलाइन विक्रेते आणि इतर संबंधित आस्थापनांनी निर्धारित मानकांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. खाद्य तेलाच्या संदर्भात अनुपालन आदेश काढण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. सध्या ४९६ केंद्रीय परवानाधारकांची नोंद असल्याची माहितीही त्यांनी दिली.

FDA Action On Hotels: तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीबाबत स्पष्ट इशारा

सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीबाबतही मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला. खाद्य तेल पॅकेजिंगमध्येच विकले जावे, असा नियम आधीपासून असल्याचे सांगत किरकोळ विक्रेत्यांनीही सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः मोहरीचे तेल शंभर टक्के मोहरीचे तेल म्हणूनच विकले पाहिजे, त्यात अनधिकृत मिश्रण करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तळणीचे तेल वारंवार वापरण्याच्या प्रकारावरही प्रशासनाचे लक्ष आहे. हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये एकाच तेलाचा वारंवार वापर केला जात असल्यास त्यावर कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला. खाद्य तेलाचे टिन किंवा डबे पुन्हा वापरण्याच्या पद्धतीबाबतही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भेसळीच्या प्रकरणात दंडाची तरतूद असून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही कारवाई केली जाऊ शकते.

दरम्यान, ग्राहकांनी सुटे तेल खरेदी न करता पॅकेज्ड तेलाला प्राधान्य द्यावे, पॅकेटवरील लेबल आणि सील तपासावे तसेच उत्पादन आणि मुदत समाप्तीची तारीख पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. घरात किंवा बाहेर तळणीचे तेल वारंवार वापरले जात असल्यास ते टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

खाद्य तेलातील भेसळ हा केवळ आर्थिक फसवणुकीचा विषय नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या उत्पादनापासून ग्राहकांच्या स्वयंपाकघरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर आता FDA कडून अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

विक्रेत्यांना 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा, नागरिकांनाही आवाहन

खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केलं तर 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आहे. भेसळ केल्यास 10 लाखापर्यत दंड आहे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाखापर्यत दंड आहे, अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी दिली. सुट्टे तेल विकत घेऊ नका, पॅकेज तेल आहे तर लेबल बघा, सील बंद आहे का चेक करा, त्याची मुदत बघा, एक्सपायरी डेट बघा. तळनीचं तेल वारंवार घरी सुद्धा वापरू नका आणि हॉटेलमध्ये सुद्धा वापरलं जात असेल तर तिथे खाऊ नका. हा इशू फक्त फसवणुकी पुरता मर्यादित नाही, आरोग्यावर याचा परिणाम होतोय. मेंदू विकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळवतात, आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल आहे, अशी माहिती देत आवाहन तुकाराम मुंढेंनी केलं आहे.

Web Title: Tukaram mundhe fda edible oil adulteration maharashtra action rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • FDA
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल
1

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई
2

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार
3

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; भेसळखोरांवर कारवाई सुरूच राहणार

FDA Complaint System : हॉटेलमध्ये खराब जेवण? थेट करा FDA कडे तक्रार, फक्त QR Code स्कॅन करा, फोटो आणि व्हिडिओ पाठवा
4

FDA Complaint System : हॉटेलमध्ये खराब जेवण? थेट करा FDA कडे तक्रार, फक्त QR Code स्कॅन करा, फोटो आणि व्हिडिओ पाठवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.