Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील चार पंचतारांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी चार हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 12:57 PM
स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

स्वयंपाकघरात झुरळे, मुदतबाह्य पदार्थ; लोणावळ्यातील चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • चार हॉटेल्सचे परवाने निलंबित
  • मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळले
  • झुरळांचा वावर; एफडीएची कारवाई
वडगाव मावळ/ सतिश गाडे : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील चार पंचतारांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पंचतारांकित हॉटेल्समधील अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत लोणावळ्यातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेसंदर्भातील अनुसूची चारमधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.

दि ऑर्किड हॉटेलमध्ये ११ मुदतबाह्य दुधाची पाकिटे

दि ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि शीतगृहात दुधाची ११ मुदतबाह्य पाकिटे आढळून आली. तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, स्वयंपाकघरात पाणी साचणे, अस्वच्छ फ्रीज आणि विनाझाकण कचरापेट्या अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

रिदम हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळांचा वावर

रिदम हॉटेलच्या स्वयंपाकघरासह बेकरी विभागात झुरळांचा वावर आढळला. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र साठवणूक केली जात नव्हती. अन्नपदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर आवश्यक लेबल नव्हते. तसेच कीटक नियंत्रणासंदर्भातील नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड

बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळून आल्याने ते जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. खाद्य रंग आणि अजिनोमोटोचा वापर होत असतानाही मेन्यू कार्डवर त्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

हे सुद्धा वाचा : अतिक्रमाणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणार: नवलकिशोर राम

द फर्न हॉटेलमध्ये मृत आणि जिवंत झुरळे

द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात असल्याचे आढळले. हे खाद्य रंग नष्ट करण्यात आले. याशिवाय स्वयंपाकघरात मृत आणि जिवंत झुरळे आढळल्याने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

या सर्व गंभीर बाबींची दखल घेत एफडीएने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लोणावळ्यातील किती हॉटेल्सवर एफडीएने कारवाई केली?

    Ans: अन्न व औषध प्रशासनाने लोणावळ्यातील दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार पंचतारांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले.

  • Que: हॉटेल्समध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या?

    Ans: मुदतबाह्य दूध, चीज, ब्रेड व खाद्य रंग, झुरळांचा वावर, अस्वच्छ स्वयंपाकघर, कच्चे व शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे आणि अन्नपदार्थांवर योग्य लेबल नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

  • Que: एफडीएने हॉटेल्सविरोधात कोणती कारवाई केली?

    Ans: अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

Web Title: The fda has taken action against four hotels in lonavala nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • Lonavala news

संबंधित बातम्या

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित
1

FDA Action: एकादशीच्या ४८ तास आधी पंढरपुरात एफडीएचा धाडसत्र! ‘या’ चार प्रसिद्ध आस्थापनांचे परवाने निलंबित

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित
2

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!
3

Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द
4

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.