Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 05:54 PM
मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मे महिन्यात Tulja Bhavani Temple विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

Follow Us
Close
Follow Us:
  • तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
  • दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची राहील प्रमुख उपस्थिती
  • पालकमंत्री सरनाईक यांची माहिती
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यासंदर्भात मंत्रालयात गुरुवार, ९ एप्रिल रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! सरकारी रुग्णालयांतूनच औषध देण्याचे वैद्यकीय अधिष्ठातांना स्पष्ट निर्देश

पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या १०५ खाजगी मालमत्तांपैकी सुमारे ७५ टक्के मालमत्ताधारकांशी यशस्वी वाटाघाटी पूर्ण झाल्या असून उर्वरित प्रक्रियाही लवकर पूर्ण केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, विविध विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा भव्य आणि दिव्य विकास करण्यासाठी नियोजनबद्ध कामे करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत रामदरा तलाव परिसरात शिवसृष्टी उद्यान उभारणी, मंदिर परिसरातील आठ प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, तसेच आठ कुंडांचे पुनरुज्जीवन यावर चर्चा झाली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास व दर्शन मंडप उभारणीसंदर्भातही सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, शहरासाठी स्वतंत्र मास्टर प्लॅन तयार करून सुनियोजित विकास साधण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पुतळे उभारणीसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांविषयी समाजात असलेला आदर लक्षात घेता त्यांच्या स्मारकांची उभारणी नियमानुसार व्हावी, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. काही ठिकाणी अनधिकृत पुतळे उभारले जात असल्याने सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करून इच्छुकांना शासनाच्या निकषांनुसार मार्गदर्शन करावे, असे निर्देश देण्यात आले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा, मृद व जलसंधारण, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

जलजीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी; अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द

Web Title: Tulja bhavani temple development bhoomipujan may cm dcm presence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला
1

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती
2

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती

Mhasobachiwadi : ९४ व्या नारळी सप्ताहाचा म्हसोबाची वाडी येथे थाटात समारोप; १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचा डोंगर!
3

Mhasobachiwadi : ९४ व्या नारळी सप्ताहाचा म्हसोबाची वाडी येथे थाटात समारोप; १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचा डोंगर!

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
4

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.