Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

वाई येथे एका धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून तो मृत्यूचा सापळा ठरत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 06:23 PM
वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

Follow Us
Follow Us:

वाई : बावधन नाका ते मिशन हॉस्पिटल रिक्षा स्टँड दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः “मृत्यूचा सापळा” ठरला असून, उडणारी प्रचंड धूळ, खड्डे आणि निष्काळजी दुरुस्तीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली आहे.

सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारिक खडी आणि कच टाकून केवळ दिखाऊ काम केल्याचा आरोप होत आहे. योग्य तांत्रिक पद्धतीने काम न केल्यामुळे रस्त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळीचे प्रचंड लोट उडत आहेत. यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. रिक्षाचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असता, संबंधित रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता केवळ चार-पाच कर्मचारी पाठवून “दिखावा” करण्यात आला. फोटो काढले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत झाडू मारल्याचा आव आणत घटनास्थळ सोडले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी अक्षरशः केराच्या टोपलीत फेकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Satara Politics: काँग्रेसच्या सृजन अभियानाची साताऱ्यातून सुरुवात, हिमाचल प्रदेशचे आमदार मलिंदर राजन यांची प्रमुख उपस्थिती

दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना दिवसभर धुळीचा मारा सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचे गंभीर त्रास सुरू झाले आहेत. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर टाकलेल्या सैल खडीमुळे घसरून आतापर्यंत अनेक दुचाकी अपघात झाले असून, चार ते पाच अपघातांची नोंद झाली आहे. अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. विशेष म्हणजे, याच मार्गावर असलेल्या मिशन हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले यांनाही या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या परिसरातही धुळीचे ढग उडत असल्याने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या निष्काळजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव गेला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. “आणखी किती बळी गेल्यावर हे मस्तावलेले अधिकारी जागे होणार?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

स्थानिक रिक्षाचालक संघटनेनेही प्रशासनाला अंतिम इशारा दिला असून, संबंधित ठेकेदाराने तात्काळ रस्त्याची स्वच्छता करून दर्जेदार दुरुस्ती करावी. अन्यथा येत्या आठ दिवसांत समाधानकारक काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच, वाईतील हा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

वाई शहरातील नागरिक विचारत आहेत सातारा जिल्ह्याला चार मंत्री दोन खासदार असून सुद्धा सातारा जिल्ह्याचा विकास साधला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या पक्षाचे नेते व पद मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मंत्र्यांनी नागरिकांना होणाऱ्या वेदनांची थोडी तरी जाण ठेवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून होत आहे.

बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! सरकारी रुग्णालयांतूनच औषध देण्याचे वैद्यकीय अधिष्ठातांना स्पष्ट निर्देश

Web Title: Wai dangerous road accidents public anger administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
1

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
3

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
4

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.