Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्यपदे अशा एकूण ४३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 05:01 PM
भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Follow Us
Follow Us:

भोर : भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्यपदे अशा एकूण ४३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मंगळवार (दि. ७) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या ‘शांतता’ असली तरी पडद्यामागे मात्र रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.

 

भोर तालुक्यातील आपटी, करंदी खुर्द, कोळवडी, खडकी, परहर बुद्रुक, रावडी, शिरवली, सोणवडी आणि वाढाणे या ९ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असून, चुरशीची लढत होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट आणि निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली. निवडणूक ही प्रामुख्याने अंगसुळे, आंबेघर, आपटी, करंजे, करंदी खुर्द, कांबरे खे.बा., कासुर्डी गु. मा., कुंबळे, कोर्ले, कोळवडी, खडकी, तेलवडी, परहर बुद्रुक, बसरापूर, म्हाकोशी, रावडी, वडतुंबी, वाढाणे, वारखंड, शिरगाव, शिरवली, सांगवी, सांगवी बुद्रुक, सांगवी हि.मा.,साळव आणि सोनवडी. या गावांसाठी होणार आहे.

झेडपी व पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा धुमशान

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धूळ खाली बसते न बसते, तोच आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील राजकीय वारे पुन्हा वेगाने वाहू लागले आहेत. झेडपी निवडणुकीत कोणत्या गावात कोणाला मताधिक्य मिळाले, याचा आढावा घेऊन दिग्गज नेते आता पोटनिवडणुकीसाठी व्यूहरचना आखत आहेत. रिक्त जागी प्रबळ आणि सर्वसमावेशक उमेदवार देण्यासाठी गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या दोन दिवसांत अर्ज आले नसले, तरी शेवटच्या दोन दिवसांत अर्जांचा ओघ वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अर्ज भरण्यासाठी : ७ ते १३ एप्रिल

अर्ज छाननी १५ एप्रिल

अर्ज मागे घेण्याची मुदत : १७ एप्रिल (दुपारी ३ वाजेपर्यंत).

चिन्ह वाटप : १७ एप्रिल (दुपारी ३ नंतर).

मतदान : २८ एप्रिल सकाळी ७:३० ते ५:३०.

निकाल : २९ एप्रिल.

Web Title: By elections are being held for vacant seats in many gram panchayats in bhor taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Election News
  • grampanchayat election result
  • maharashtra

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगलीत महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या विजयाचा निर्धार
2

सांगलीत महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या विजयाचा निर्धार

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.