चाकण येथे खाजगी बसची एसटीला जोरदार धडक; 13 जण जखमी
हिंगोली : हिंगोलीच्या औंढा-नागनाथ रस्त्यावर भीषण अपघात झाला. टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.15) दुपारी दोनच्या सुमारास किन्होळा पाटीजवळ झाला. भरधाव टेम्पो (एमएच ०४ बीजी ५३४७) व दुचाकी (एमएच ३८ एएफ ४७११) यांच्यात जोरदार धडक झाली. यातच दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये वसमत मंगळवार पेठेतील अंकुश महाजन जैन (चालक) व शुभम महाजन (सोबतचा मित्र) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे औंढा नागनाथहून वसमतकडे दुचाकीने परतत असताना वसमतहून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघेही गंभीर जखमी झाले.
हेदेखील वाचा : Accident : सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात; कार उलटून डॉक्टरचा जागीच मृत्यू
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ
अंकुश महाजन खाजगी वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. तर शुभम महाजन हा खाजगी विमा कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच नातेवाईक व मित्रमंडळी रुग्णालयात धाव घेतली असून, गावात शोककळा पसरली आहे.
सोलापुरातही कारचा अपघात
सध्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. दुसऱ्या एका घटनेत, सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला.