नाराज शिवसैनिकांच्या मनधरणीकरिता दानवेंची मध्यस्थी, बैठकीनंतरही शिवसैनिकांचा निर्णय पक्का !
नांदेड: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी व जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अंबदास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. दानवे नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. दरम्यान नांदेड दौऱ्यावर असताना दानवे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवरील टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. गद्दार बाबुरावपेक्षा फुकटचा बाबुराव काय वाईट आहे, गद्दारी करण्यापेक्षा फुकट राहणं काय वाईट आहे, असे दानवे यांनी शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “जय पद्धतीने नितेश राणे यांची वक्तव्ये राज्यभरातून येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं एक दिवस नितेश राणेला सुद्धा असंच जाव लागणार आहे.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्वरित पंचनामे करून त्यांना मदत मिळावी. मात्र सध्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांच्या वीक विम्याचे पैसे अजूनही मिळणे बाकी आहेत. त्यामुळे जनतेला सरकारकडून काही अपेक्षा आहेत असे मला वाटत नाही.”
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर बोलताना दानवे म्हणाले, “एसटीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार मिळाला पाहिजे. आता जो ५६% दिला होता. कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. याच्यासाठी मागच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी आंदोलन केले होते, आता हे लोक कुठल्या बिळात घुसून बसले आहेत, हे मला माहित नाही.”
Ambadas Danve : फुकटचा बाबुराव, गद्दार बाबुरावपेक्षा चांगला | NAVARASHTRA#Maharashtra #AmbadasDanve #PoliticalNews #MarathiNews pic.twitter.com/yujcLIgPkV
— Navarashtra (@navarashtra) April 11, 2025
अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट
राज्याचे नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून संसदेमध्ये अद्याप अधिवेशन सुरु आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थात राज्यसभा आणि लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केले आहे. मुस्लीम समाजाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे विधेयक आणले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra Politics : अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट; राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यांच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही भेट ईदसाठी असून यामध्ये कोणताही राजकीय विषय नसल्याचे मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.