Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: “… ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची शासनाची तयारी”; उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही

दावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटी, दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले, असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2025 | 09:49 PM
Maharashtra News: “… ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची शासनाची तयारी”; उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाकडून तयारी आहे, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 2022 – 23 आणि 2023- 24 या वर्षांकरिता “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025” चे वितरण मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले की, राज्याच्या निर्यातीचे गुणोत्तर दहा पटीने वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणे आणली जात आहेत. यात एव्हीजीसी, जीसीसी, बांबू, लेदर, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स यासारखी धोरणे लवकरच येणार आहेत. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दावोस, जर्मनी, जपान यासारख्या परदेश दौऱ्यांतील कराराद्वारे महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक वाढल्याचे सांगत उद्योग मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, दावोस येथे पहिल्या वर्षी 1.70 लाख कोटी, दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटी तर तिसऱ्या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे विक्रमी सामंजस्य करार झाले. या सामंजस्य कराराच्या 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LIVE | Maharashtra State Export Awards-2025 https://t.co/G1T6YDBzb1 — Uday Samant (@samant_uday) October 13, 2025

उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी उद्योजकांना आवाहन केले की, पुरस्कार स्वीकारताना आपण महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करत आहात, त्यामुळे भूमिपुत्राला रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील उद्योजकांनी नवी मुंबईतील आगामी प्रकल्पासाठी पहिले ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीत सुरू करून स्थानिक तरुणांना किमान 40 हजार रुपये वेतन मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग स्थापनेनंतर स्थानिक रोजगार आणि भूसंपादन या दोन कारणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि उद्योजक संघटनांनी यात नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मैत्री पोर्टल आणि मिलाप प्रणालीमुळे उद्योजकांची कामे अधिक गतीने व पारदर्शकपणे होत आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

राज्याच्या विकासात उद्योजकांचे मोठे योगदान असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मागील तीन वर्षांत 57 हजार0 उद्योजक तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना विस्तारासाठी आता ‘रेड कार्पेट’ दिल्यामुळे मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात होत आहे. त्याचप्रमाणे, मागील दोन वर्षांत 1.5 लाख बेरोजगार युवकांना उद्योजकांनी रोजगार मिळवून दिल्याबद्दल उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी आभार व्यक्त केले. उद्योगांकरिता तयार करण्यात येणाऱ्या धोरणांचा फायदा उद्योजकांपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी विभागाला केली.

Web Title: Uday samant distribution industries maharashtra state export award 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Business News
  • maharashtra news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

ITR Refund Delay: रिफंड स्टेटस ‘Processed’ दाखवते पण पैसे खात्यात आले नाहीत? जाणून घ्या कारण आणि उपाय
1

ITR Refund Delay: रिफंड स्टेटस ‘Processed’ दाखवते पण पैसे खात्यात आले नाहीत? जाणून घ्या कारण आणि उपाय

EPFO कडून मोठी घोषणा! PF मधील रक्कम आता सहजपणे मिळणार, कर्मचाऱ्यांना 100 टक्के पैसे काढण्याची मुभा
2

EPFO कडून मोठी घोषणा! PF मधील रक्कम आता सहजपणे मिळणार, कर्मचाऱ्यांना 100 टक्के पैसे काढण्याची मुभा

पालघरमध्ये मजूरांच्या दिवाळीवर गडद सावली! रोजगार हमी योजनेची 18.37 कोटींची मजुरी अद्याप थकित
3

पालघरमध्ये मजूरांच्या दिवाळीवर गडद सावली! रोजगार हमी योजनेची 18.37 कोटींची मजुरी अद्याप थकित

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, सप्टेंबरमध्ये SIP इनफ्लो 29,361 कोटींच्या उच्चांकावर
4

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, सप्टेंबरमध्ये SIP इनफ्लो 29,361 कोटींच्या उच्चांकावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.