Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ या उदयनराजेंच्या भूमिकेला प्रमुख राजकीय नेते आणि सहकार क्षेत्रातील गट कसा प्रतिसाद देतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बँकेचे हित, शेतकरीहित आणि राजकीय समीकरणे यामध्ये संतुलन साधण्याचे आव्हान आता इच्छुकांसमोर राहणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 19, 2026 | 11:49 AM
जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण

Follow Us
Follow Us:

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे असतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकाराचा मुद्दा पुढे केला आहे. बँकेची निवडणूक पक्षीय राजकारणाच्या आखाड्यात न जाता शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून व्हावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांबरोबरच ‘सहकार विरुद्ध राजकारण’ हा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

जिल्हा बँकेचे नेतृत्व यापूर्वी अनेक दिग्गजांनी केले. मात्र, बँकेच्या कामकाजात राजकीय मतभेद बाजूला ठेवून संस्थेच्या हिताला प्राधान्य दिल्याचा दाखला उदयनराजेंनी दिला आहे. आर्थिक संस्थेच्या कारभारात राजकारणाचा अतिरेक झाल्यास त्याचा परिणाम संस्थेच्या कामकाजावर आणि विश्वासार्हतेवर होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि खातेदारांना मोठ्या प्रमाणावर सेवा दिली जात आहे.

Nashik Crime : धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

३१७ शाखा, ६७ एटीएम आणि ६५० मायक्रो एटीएमचे जाळे असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. निव्वळ एनपीए सलग १९ वर्षे शून्य टक्के असून कर्जवसुली ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

निवडणूक जवळ येत असताना जिल्ह्यातील विविध राजकीय गटांकडून संभाव्य उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उदयनराजेंनी मांडलेली भूमिका केवळ आवाहन न राहता निवडणुकीतील चर्चेचा प्रमुख विषय बनते का, याकडे लक्ष लागले आहे.

आवाहनाची कसोटी

‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ या उदयनराजेंच्या भूमिकेला प्रमुख राजकीय नेते आणि सहकार क्षेत्रातील गट कसा प्रतिसाद देतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बँकेचे हित, शेतकरीहित आणि राजकीय समीकरणे यामध्ये संतुलन साधण्याचे आव्हान आता इच्छुकांसमोर राहणार आहे.

Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा; केंद्र सरकारकडून वनजमिनीच्या हस्तांतरणाला अंतिम मंजुरी !

Web Title: Udayanraje bhosale mantra of cooperation ahead of the district bank election battle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Satara District Bank Election
  • Udayanraje Bhosale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.