धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
मिळालेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांची ही चिमुरडी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या आई-वडिलांसोबत अंथरुणावर झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास पालकांना जाग आली असता मुलगी अंथरुणावर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अचानक मुलगी दिसेनाशी झाल्यामुळे पालकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.मात्र कुठेच सापडली नाही…
सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
अवघ्या आठ महिन्यांची चिमुरडी स्वतःहून घरातून दूर जाण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तिच्या अपहरणाची भीती व्यक्त केली आहे. मध्यरात्री आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली मुलगी नेमकी कशी आणि कुठे गायब झाली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे मन्याड चौकी परिसरात खळबळ उडाली आहे. चिमुरडीचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ती बेपत्ता होण्यामागे नेमके काय घडले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या तपासाची अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच मुलगी बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि अपहरणाच्या संशयाबाबत अधिक स्पष्टता येऊ शकणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…






