Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र बंद किती वेळ असणार, कोणाला सूट? उद्धव ठाकरेंनी दिली इत्यंभूत माहिती

राज्यामध्ये सध्या बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर शाळेमध्ये करण्यात आलेल्या अत्याचारामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीवने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंद नेमका का असणार आणि कधी पर्यंत असणार याची उद्धव ठाकरे यांनी पूर्ण माहिती दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 23, 2024 | 01:38 PM
24 ऑगस्ट शुक्रवारी का आहे महाराष्ट्र बंद

24 ऑगस्ट शुक्रवारी का आहे महाराष्ट्र बंद

Follow Us
Follow Us:

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अवघ्या काही वर्षांच्या चिमुरडीवर शाळेमध्ये झालेल्या या प्रकारामुळे तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यात विद्यार्थीनी सुरक्षित नसल्याची भावना महाविकास आघाडीने व्यक्त केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (दि.24) महाराष्ट्र बंद पुकारला आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीची बाजू मांडली आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याचे सांगितले. तसेच हा बंद राजकीय नसून आपल्या बहीणींसाठी मुलींसाठी असल्याचे मत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना मुलगी शाळेत सुरक्षित आहे का. कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का असं माता भगिनींना वाटतकं. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

किती वेळ असणार बंद?

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद कसा आणि किती वेळ असेल याची रुपरेषा स्पष्ट केली. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की,  हा बंद सर्व नागरिकांचा असेल. यामध्ये कोणताही जात, पात, धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील सामील व्हावे, कारण हा विकृतीच्या विरोधात बंद आहे. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोणाला असणार सुट?

उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, उद्याचा बंड कडकडीत असणार आहे. दोन वाजेपर्यंत हा महाराष्ट्र बंद असेल. पण त्यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा. कारण उत्सव आहे. आम्ही बंदमध्ये कायदा हातात घेणार नाही. बंद म्हणजे बंद आहे. मात्र पोलिसांनी बंदच्या आड येऊ नये. शांततेमध्ये बंद करु द्यावा.

मुख्यमंत्र्यांना असणार खास सुट

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास सूट दिली आहे. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना एक सूट देण्यात आली आहे. ते बाकी मुख्यमंत्री रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणीची मते विकत घेऊ शकता, तर बहीण ही विकाऊ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Web Title: Uddhav thackeray gave information about maharashtra band nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • Badlapur school case
  • Maharashtra Bandh
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.