Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thackeray-MNS Conflict: मनसे-ठाकरे पुन्हा आमनेसामने; मनसेचं मराठीसाठी आंदोलन, उद्धवसेनेची नवी खेळी

मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2025 | 12:40 PM
Thackeray-MNS Conflict: मनसे-ठाकरे पुन्हा आमनेसामने; मनसेचं मराठीसाठी आंदोलन, उद्धवसेनेची नवी खेळी
Follow Us
Follow Us:

मुंबई:  मुंबईत मराठी भाषेच्या वापराबाबत पुन्हा एकदा वातावरण तापले असून, मनसेकडून मराठीच्या आग्रहासाठी आंदोलन सुरू आहे. मराठीत बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना घडत असतानाच, आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उद्धव गट) वेगळीच भूमिका घेत हिंदी भाषिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. कांदिवली परिसरात उद्धवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्या वतीने “मिळून सारे शिकूया मराठी भाषा” या संदेशासह बॅनर लावण्यात आले आहेत. “घाबरू नका, चला मराठी बालूया” आणि “हम आपको मराठी भाषा सिखाएंगे” अशा घोषणा करत मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र, या पोस्टरमधील मराठी मजकुरात व्याकरणाच्या त्रुटी आढळल्या आहेत. उदाहरणार्थ, “घाबरू नका” या वाक्यानंतर अयोग्यरित्या प्रश्नचिन्ह वापरण्यात आले आहे. तसेच, “चला करू या मराठी भाषेचा सन्मान” या योग्य वाक्याच्या जागी “चला करूया मराठी भाषाचे सन्मान” असे चुकीचे वाक्य छापले गेले आहे.  कांदिवलीतील एअरटेल गॅलरीमध्ये मराठीत संवाद साधणाऱ्या एका तरुणाशी कर्मचाऱ्याने वाद घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आणि एअरटेलला इशाराही दिला.

भारताच्या उपकाराचीही उपेक्षा; ड्रॅगनसोबतची मैत्री ही जणू विषाचीच परीक्षा

त्याचप्रमाणे, एका हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाने “मराठी गया तेल लगाने” असे विधान केल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित रक्षकाला चोप दिल्याचे वृत्त आहे. सध्या मनसेकडून विविध बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदनं दिली जात आहेत, मात्र काही ठिकाणी परप्रांतीय कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंगही समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँदिवली भागात “मराठी भाषा शिकवणी वर्ग” सुरू करत बॅनर लावले असून, यातून मनसेच्या भूमिकेला टोला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. “मिळून सारे शिकूया मराठी” असा संदेश देणाऱ्या या पोस्टर्समध्ये व्याकरणाच्या काही त्रुटीही आढळून आल्या आहेत, ज्यावरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

World Health Day: दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू! समोर आले बालकांच्या मृत्यूचे धक्कादायक

मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मराठी भाषा आणि मराठी जनतेवरील अन्यायाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतील मुद्द्यांची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा सन्मान राखणे हे राज्य सरकारचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे नमूद करत, सामंत यांनी पुढील ८ ते १० दिवसांत सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेण्याची घोषणा केली. या बैठकीत मराठी भाषेच्या वापराबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Uddhav thackeray mns conflict on marathi language nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.