दिल्लीमध्ये दररोज होतो सरासरी २० बालकांचा मृत्यू!
दरवर्षी जगभरात सगळीकडे 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.जगभरातील सगळ्यांचा निरोगी आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आणि आरोग्य किती महत्वाचे हे पटवून देण्यासाठी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी “आपला ग्रह, आपले आरोग्य” ही थीम ठरवण्यात आले आहे. चुकीचा जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे मधुमेह, कॅन्सर, हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांसंबधित आजार, कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. वाढत्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी सगळीकडे जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.(फोटो सौजन्य – iStock)
World Health Day 2025 : जागतिक आरोग्य दिन का आणि केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या थीम
राजधानी दिल्लीमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जन्माला आल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये जवळपास एका दिवसाला २० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू होतो. बालकांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. गर्भधारणेदरम्यान अयोग्य विकास, कुपोषण, न्यूमोनिया आणि सेप्टिसीमिया इत्यादी आजारांची लागण बालकांना होण्याची शक्यता असते. आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न झाल्यामुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, मात्र अजूनही गरजूंपर्यंत कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.
आईच्या गर्भात बाळाचा योग्य विकास न होणे, रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधा इत्यादी अनेक कारणांमुळे बाळाच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्यसुविधा पुरवणे आवश्यक आहे. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी गर्भाशयतच बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यंदाच्या वर्षीच्या थीममध्ये जास्त भर दिला जाईल.
गर्भवती मातांच्या प्रसूतीमध्ये 95.58 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे माता मृत्युदर 0.50 पेक्षा कमी झाला आहे.पण 2023 मध्ये 142 गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेवर नवजात बालक आणि अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. बालकांच्या आकडेवारीचा दर वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील चार वर्षांमध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे.
अमेरिकेमध्ये गर्भवतीच्या मातांच्या प्रसूतीमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीसह संपूर्ण देशात माता आणि बालमृत्यूचे प्रमाण दीड ते दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे, पण यादरात काहीशी वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे यामध्ये सुधारून करून बालकांचे जीव वाचवण्यावर भर देणे जास्त गरजेचे आहे.अमेरिकेमध्ये 1000 बालकांच्या जन्म झाल्यानंतर 5 किंवा 6 बालकांच्या मृत्यूची नोंद होते. या तुलनेत अमेरिकेमध्ये बालकांचा मृत्यूदर जास्त आहे.