Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात या दिवशी धडाडणार ठाकरेंची तोफ; 5 नोव्हेंबरला फुटणार प्रचाराचा नारळ

उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच सभा रत्नागिरी येथे होणार आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 30, 2024 | 09:00 PM
उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता वेध लागलेत ते प्रचाराचाचे. सोमवारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, त्यानंतर राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रचाराचा नारळ ५ नोव्हेबरला फुटणार असून एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच सभा रत्नागिरी येथून म्हणजेच कोकणातून होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानवा जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत कोकणातून महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातून निवडणूक प्रचारसभांची सुरुवात करत आहेत.

हेही वाचा-Maharashtra Election 2024 : PM मोदी, गडकरी अन् योगी आदित्यनाथ… राज्यात तब्बल १३३ सभा; भाजपची मोठी रणनीती

शिवसेनेच्या प्रचारासाठी ठाकरेंची फौज

  • उद्धव ठाकरे
  • आदित्य ठाकरे
  • संजय राऊत
  • सुषमा अंधारे
  • अंबादास दानवे
  • अरविंद सावंत
  • भास्कर जाधव
  • अनिल देसाई
  • विनायक राऊत
  • आदेश बांदेकर
  • नितीन बानुगडे पाटील
  • प्रियांका चतुर्वेदी
  • सचिन अहिर
  • संजय (बंडू) जाधव
  • किशोरी पेडणेकर

हेही वाचा –Maharashtra Election 2024 : अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पण विरोधात उमेदवार देण्यामागे नक्की रणनीती काय?

  • ओमराज निंबाळकर
  • जान्हवी सावंत
  • ज्योती ठाकरे
  • किरण माने
  • संजना घाडी
  • शरद कोळी
  • आनंद दुबे
  • प्रियांका जोशी
  • लक्ष्मण वडले

दिग्गज नेते रणांगणात

यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतून जवळपास प्रत्येक पक्षाकडून जवळपास ८५ जागांवर निवडणूक लढण्याव एकमत झालं आहे. १५ जागांचा तिढा आहे. त्यामुळे ठाकरे गटाने ९० हून अधिक जणांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

विधानसभेच्या 288 मतदारसंघातील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असणार आहे. त्यामुळे,सर्वच राजकीय पक्ष सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राज्यात 10 ते 15 सभा होणार असल्याची माहिती आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभेत मोदी प्रमुख मतदारसंघात सभा घेतील. भाजपकडून 40 स्टारप्रचारकांची यादाही जाहीर करण्यात आली आहे.

 

Web Title: Uddhav thackeray start campaign and rally on 5 november from ratnagiri also held in eknath shinde thane constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 08:39 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा
1

“सत्ताधारी मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा निषेध!”; ठाकरे गटाचा सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चा

Mumbai :  अडीच वर्षात विकास प्रकल्पांतील स्पीडब्रेकर केले दूर ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
2

Mumbai : अडीच वर्षात विकास प्रकल्पांतील स्पीडब्रेकर केले दूर ; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Thane News : ठाकरे गटाचा पुढाकार; आता अमराठींसाठी मराठी शिकवणीचे वर्ग सुरु
3

Thane News : ठाकरे गटाचा पुढाकार; आता अमराठींसाठी मराठी शिकवणीचे वर्ग सुरु

Mumbai : जर आम्ही आंदोलन केलं नाही तर सत्ताधारी माजतील – Sanjay Raut
4

Mumbai : जर आम्ही आंदोलन केलं नाही तर सत्ताधारी माजतील – Sanjay Raut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.