महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या १३३ सभा होणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधून सुरू असून काही ठिकाणी प्रचारालाही सुरुवात झाली आहे. सोमवारनंतर राज्यात प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत जसा फटका बसला तसा विधानसभेतही बसू नये यासाठी भाजप आणि महायुतीने जोरदार तयारी केली आहे. प्रंतप्रधान मोंदींसह देशातील मोठ्या नेत्यांना प्रचारात उतरवलं आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. क
निवडणूक काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ रॅली होणार आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकूण १५ सभा होणार आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते उडवणार प्रचाराचा धुरळा
पंतप्रधान मोदी – ८
नितीन गडकरी – ४०
अमित शहा – २०
योगी आदित्यनाथ – १५
देवेंद्र फडणवीस – ५०
हेही वाचा-Heena Gavit : ऐन निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; हिना गावीत यांची बंडखोरी
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठं अपयश आलं. तसाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपने राज्यात मोठी रणनीती आखली आहे. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा मानस आहे. त्यामुळे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि राज्यातील नेत्यांची मोठी फौज यावेळी प्रचारात उतरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत सर्वात जास्त फटका भाजपला बसला होता. कारण पूर्वीच्या जागाही भाजपला राखता आल्या नाहीत. केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामानाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा मिळाल्या. अजित पवार गटालाही मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दांडगा आहे. त्यात कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचा प्रभाव या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलन, फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात सामावून घेतलेल्यामुळे पक्षाला टीकेला सामोरं जावं लागलं आहे. तसंच संविधान बदण्याच्या भाषेमुळे अल्पसंख्याक समाजही दुखावला गेला. त्यामुळे या सर्व मुद्द्यावर दूषित झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. त्यासाठीच राज्यात प्रचाराची मोठी तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकी आधी आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मनोज जरांगें पाटील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मराठा समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात मराठा समाजाच्या प्राबल्य आहे. त्या मतदारघातील मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्याच्या सूचना मागे भाजपने दिल्या होत्या.