Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Vijayi Melava Live: आमच्यातला आंतरपाट अनाजी पंतानी दूर केला- उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली, ही केवळ बंधुत्वाची नाही, तर लाखो मराठी माणसांच्या भावना, अपेक्षा आणि संस्कृतीच्या अभिमानाची मिठी होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 05, 2025 | 01:01 PM
Uddhav Thackeray Vijayi Melava Live: आमच्यातला आंतरपाट अनाजी पंतानी दूर केला- उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray Vijayi Melava Live: “आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आबहे. आपल्यातील भांडणे विसरून जे आमच्यासाठी एकत्र आले त्यांचेही अभिनंदन.  आमच्यातीलं आंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय आहोत. आम्ही दोघ एकत्र आलो आहोत पण त्यासठी कोण लिंबू कापतंय उतारा टाकत आहे. कोणी टाचण्या मातरतयं कोणी रेडे कापत असतील त्यांना एकच सांगण आहे या अंधश्रद्धेच्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. ” अशा शब्दांत माजी मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रतीक्षित आणि ऐतिहासिक क्षण अखेर प्रत्यक्षात उतरला. वरळीच्या डोममध्ये दोन ठाकरेंची जुळवाजुळव पाहून संपूर्ण महाराष्ट्र भारावून गेला. एकाच मंचावर, एकाच वेळी, दोनही भावांचे आगमन — आणि तेही “आपले ठाकरे” या दमदार गीताच्या पार्श्वभूमीवर! मंचावर त्यांच्या प्रवेशावेळी फक्त प्रकाश आणि साउंड सिस्टीमच नव्हे, तर प्रत्येक मराठी मनात एक विजयी लाट उसळली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली, ही केवळ बंधुत्वाची नाही, तर लाखो मराठी माणसांच्या भावना, अपेक्षा आणि संस्कृतीच्या अभिमानाची मिठी होती. सभागृहात उपस्थित असलेले कार्यकर्ते, समर्थक आणि पाहुणे यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. हे अश्रू दु:खाचे नव्हे, तर संयम, प्रतीक्षा आणि आत्मसन्मानाच्या विजयाचे होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” हे सर्व आपणच करून ठेवलं आहे भाषेवरून जर एखादा  विषय होतो तो वरवर धरून चालणार नाही. मधल्या काळात आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला वापरायचं आणि फेकून द्यायंच आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार. वापर करून घेतला. डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते  तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात.  राज ठाकरेंनी सर्वांची शाळा काढली पण मोदींची शाळा कोणती ते तर उच्च शिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे.  मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं, हिंदुत्व ही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे, कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्त्व शिकवताय. देवेंद्र फडणवीसांच्या बातम्या मी आणल्या आहेत. यात ते म्हणत आहेत की भाषेच्या नावावर गुंडगिरी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय  मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर आम्ही गुंड आहोत.  न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही.  हे सर्व राजकीय वागडे  फडणवीसांच आजचं वक्तव्य म्हणजे संयुक्त  महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला  स.काय पाटील यांचं वक्तव्य आठवतयं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तेव्हाचे सत्ताधारी मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते.  सका पाटील बोलले होते. मुंबई मराठी माणसाला मिळणार नाही. पण मराठी माणसाने त्यांना गुडघ्यांवर झुकवलं.

कशासाठी हा घोळ घालत आहात. यांचं सध्या जे काही सुरू आहे.  कश्मीरमधील ३७० कलम हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यावेळी एक  निशाण, एक प्रधान एक विधान अशी त्यांनी घोषणा दिली होती.  बरोबर आहे. देश, संविधान एकच असला पाहिजे आणि निशाणही एकच असले पाहिजे तो म्हणजे तिरंगा, भाजपचं भांडी पुसायचं फडकं असता कामा नये. ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाही.  त्यानंतर आता नवीनच सुरू केलंय वन नेशन वन इलेक्शन, हळूवारपणे एक एक करत हिंदी, हिंदू  हिंदूस्तान, हिंदू आणि हिंदूस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. कितीही कमिट्या करा हिंदीची सक्ती आम्ही होऊन देत नाही. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली आणि त्याचा मला अभिमान आहे.

 

Web Title: Uddhav thackeray vijayi melava live anaji pant removed the gap between us uddhav thackeray again taunted fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
1

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Dharmendra passed Away : “हे धर्मेन्द्रजींच्या अफाट क्षमतेचं दर्शन..; राज ठाकरेंची खास भावनिक पोस्ट
2

Dharmendra passed Away : “हे धर्मेन्द्रजींच्या अफाट क्षमतेचं दर्शन..; राज ठाकरेंची खास भावनिक पोस्ट

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का
3

Maharashtra Politics: शरद पवार गेम फिरवणार! राज ठाकरेंची मनसे MVA मध्ये करणार प्रवेश? भाजपसाठी हा मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.