Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका, फडणवीस यांना अभ्यासू समजत होतो, पण त्यांनी तर…

  • By युवराज भगत
Updated On: Sep 04, 2023 | 09:19 PM
उपमुख्यमंत्री फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका, फडणवीस यांना अभ्यासू समजत होतो, पण त्यांनी तर…
Follow Us
Follow Us:

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाविरोधात वटहुकूम का आणला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला उत्तर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम केंद्र सरकार काढते, संसदेला तो अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडा आहे. ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाही अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे. लाठीहल्ल्याचा आदेश सरकारने दिला नाही, असा दावा होत असेल तर याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले. माफी मागून सरकार मलमपट्टी करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर भाष्य केले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाकरे सरकारवर केली. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, अजित पवार यांना समजूतदार समजत होतो. मी संघनायक होतो, त्यावेळी मी चूकत होतो तर अजित पवार हे विकेटकिपर काय  करत होते, असा प्रश्न त्यांनी केला. आता जालनामध्ये जी डोकी फोडलीत त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं. मी आधी गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो. आता तर, एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी दिली. सरकारला विरोध केला तर तो आवाज दडपला जात आहे. बारसूमध्ये ही लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. हे सरकार निर्घृण आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

फडणवीस यांनी मंत्रालयाबाहेरही फिरकू नये

ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेलं. मविआ सरकारने वटहुकूम काढायला हवा होता, मुद्दा आज सरकारकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यालाही ठाकरे यांनी उत्तर दिले.  सुप्रीम कोर्टाच्या निकाल, आदेशाविरोधात वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्र सरकारला, संसदेला आहे. राज्य सरकारला वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासू समजत होतो. देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान तोकडे आहे. मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फडणवीस फिरकण्याच्या कुवतीचे नाही असा ठाकरे यांनी म्हटले.

माफी मागणे ही मलमपट्टी 

राज्य सरकारने लाठीहल्ल्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, जनभावना विरोधात जात असल्याने ही माफी मागून मलमपट्टी करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. जालन्यातील घटनेबाबत सरकार माफी मागते, मग बारसू येथील लाठीचार्जबद्दल माफी का मागत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.

Web Title: Uddhav thackerays criticism of deputy cm fadnavis they say fadnavis was considered a scholar but he nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2023 | 09:16 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
1

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
2

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
3

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Shivsena Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
4

Shivsena Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.