Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

Eknath Shinde : अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'खरा मोठा थापाडा कोण?' असा सवाल करत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 06:54 PM
Uddhav Thackeray- Eknath Shinde

Uddhav Thackeray- Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवार
  • ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत ठाकरेंना सवाल
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही ठाकरेंना सुनावलं
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले होते. यावेळी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी कोरोना काळातील घटनांचा उल्लेख केला. त्यावेळी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा रंगली.

अमित शाह यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केला. त्यांचा उल्लेख ‘चकाट्या पिटणारा गृहमंत्री’ असा करत ठाकरेंनी टीका केली. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेत उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde)

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

‘खरा मोठा थापाडा कोण?’ शिंदेंचा ठाकरेंना सवाल

पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेबाबत विचारलं असता शिंदे यांनी 2019 मधील सत्तास्थापनेच्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला. ‘ज्यांनी 2019 मध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेशी खोटं बोललं, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, मुख्यमंत्रीपदासाठी खोटं बोलले, मग खरा मोठा थापाडा कोण?’ असा सवाल त्यांनी केला.

पुढे बोलताना मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करून मोठं होण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही शिंदे म्हणाले. ‘यांना मोदी फोबिया झाला आहे,’ असा टोला लगावत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही ठाकरेंना सुनावलं

राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत, मात्र सध्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावं आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असा सल्लाही शिंदेंनी दिला. महाराष्ट्रातील जनतेला विरोधकांचा खोटारडेपणा कळला असल्याचा दावाही त्यांनी केला.

रोहित पवारांच्या VSR आरोपांवर शिंदेंचं उत्तर

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी VSR विमान कंपनीच्या मालकासंदर्भात गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. फडणवीस हे संबंधित कंपनीच्या मालकाला वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिंदेंनी फोटोचा मुद्दा उपस्थित केला. ‘एखाद्यासोबत फोटो असणे किंवा एखाद्याच्या लग्नाला जाणे म्हणजे त्याला पाठिंबा दिला असं होतं का?’ असा सवाल त्यांनी केला.

आमच्यासोबत दररोज अनेक जण फोटो काढतात. आरोप करणाऱ्यांसोबतही अनेकांचे फोटो असतील. त्यामुळे पुराव्याशिवाय आरोप करणं योग्य नाही, असं शिंदे म्हणाले.

एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय सामना रंगला असताना दुसरीकडे VSR प्रकरणावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut Contempt Case: तुम्ही अनुभवी राजकारणी..; संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका का केली?

    Ans: अमित शाह यांनी अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात कोरोना काळातील घटनांचा उल्लेख केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी 2019 मधील सत्तास्थापनेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला.

  • Que: रोहित पवारांनी VSR विमान कंपनीबाबत काय आरोप केले?

    Ans: रोहित पवार यांनी VSR विमान कंपनीच्या मालकासंदर्भात गंभीर आरोप केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधित मालकाला वाचवत असल्याचा दावा केला.

  • Que: रोहित पवारांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    Ans: केवळ एखाद्यासोबत फोटो काढला किंवा त्याच्या लग्नाला उपस्थित राहिलो म्हणजे त्याला पाठिंबा दिला, असा अर्थ होत नाही, असं शिंदे म्हणाले. रोहित पवार पुराव्याशिवाय आरोप करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: Eknath shinde attack uddhav thackeray amit shah rohit pawar vsr controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Eknath Shinde
  • rohit pawar
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai University : सिनेट सदस्य प्रदिप सावंत यांना कारणे दाखवा नोटीस; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक, मुंबई विद्यापीठाला विचारला
1

Mumbai University : सिनेट सदस्य प्रदिप सावंत यांना कारणे दाखवा नोटीस; शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक, मुंबई विद्यापीठाला विचारला

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!
2

Prasad Lad on Rohit Pawar : रोहित पवारांचे आरोप पक्षाला मान्य आहेत का? प्रसाद लाडांचा शरद पवारांना थेट सवाल!

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
3

‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा
4

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.