Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील अनधिकृत होर्डिंग आता पाडली जाणार; महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर

स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 12:01 PM
Pune Mayor office bomb threat email 2026, Nagpur RSS headquarters security threat, IED bomb threat,

Pune Mayor office bomb threat email 2026, Nagpur RSS headquarters security threat, IED bomb threat,

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत होर्डिंग पाडण्यात यावे असे आदेशही स्थायी समितीने दिले आहेत. त्याचवेळी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून ४०४ कोटी रुपयांच्या थकबाकीबाबत माहिती कळविण्यात आली नाही, अशी माहिती लेखा परीक्षण विभागाने स्थायी समितीला दिली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंग हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. यापूर्वी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रशासकीय कालावधीत बेकायदेशीर होर्डिंगच्या विरोधात मोहीम उघडली होती. यावेळी प्रशासनाने सर्वेक्षण केले, तसेच बेकायदेशीर होर्डिंग काढण्याची कारवाई केली. त्याचप्रमाणे या होर्डिंग व्यावसायिकांकडून स्टॅबिलिटी रिपोर्ट घेऊनच परवानगीचे नूतनीकरण केले गेले. आता महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींमार्फत कारभार सुरु झाल्यानंतर होर्डिंगचा विषय पुढे आला आहे.

यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग शोधण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहेत. परंतु त्या अधिकृत आहे की अनधिकृत आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

६७ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

गेल्या काही दिवसांमध्ये केवळ ६७ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली. शहरात एक हजार ते दीड हजार अनधिकृत होर्हिंग असल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे.

थकबाकी वसुल करावी; स्थायी समितीचे आदेश

शहरातील अधिकृत होर्डिंगधारकांची ७० ते ८० कोटी रुपयांची थकबाकी आहे, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून कार्यवाही केला जाणार आहे. ही वसूली एक महिन्याच्या आता वसूल करण्याचे आदेश भिमाले यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिले आहे. तसेच या विभागाच्या थकबाकीविषयी लेखापरीक्षण अहवालात तब्बल ४०४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसुलीपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीला पत्र

याबाबत मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीला पत्र दिले आहे. पुणे महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने परवाना व आकाशचिन्ह विभागाचे ऑडिट केले होते. यामध्ये दोन वेगवेगळ्या कालखंडातील मोठी थकबाकी समोर आली आहे. लेखापरीक्षण विभागाने या ४०४ कोटींपैकी फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत नेमकी किती रक्कम प्रत्यक्ष वसूल झाली, याचा तपशील सात दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुदत उलटूनही आकाशचिन्ह विभागाने ही माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

Web Title: Unauthorized hoardings in pune to be demolished municipal administration goes into action mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.