Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; ‘या’ भागात अस्वस्थता उफाळली

अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी याच पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 21, 2025 | 01:56 PM
भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; 'या' भागात अस्वस्थता उफाळली

भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन; 'या' भागात अस्वस्थता उफाळली

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आंदोलन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता उफाळली
  • कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक नेते कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेसही पार पडत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र असले, तरी याच पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नाराजीचा स्फोट गुरुवारी थेट आंदोलनाच्या रूपाने समोर आला.

माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि अमित गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे निगडी–आकुर्डी परिसरातील जुने, निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयात नेत्यांना उमेदवारीत प्राधान्य दिले जाणार, या भीतीतून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.

भक्ती-शक्ती चौकात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त मोडत आत्मक्लेश आंदोलन केले. पक्ष नेतृत्वाने ‘आयाराम’ उमेदवारांना प्राधान्य देऊ नये, तसेच अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात माजी महापौर आर. एस. कुमार, विजय सिनकर, समीर जावळकर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इमानदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “पक्ष वाढवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच डावलले जात असेल, तर हा अन्याय आहे,” अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी थेट एल्गार करण्याची भूमिका घेतली.

Web Title: Unease has increased among loyal bjp workers in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
1

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
3

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  
4

Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.