Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य' या विषयावरील अहवालाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 03, 2024 | 04:36 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की,  भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावा,

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरणीय बदल तसेच जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सागून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली.विद्यापिठांमध्ये लवकरच पर्यावरण विषयक अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार  करण्यात येईल असे राज्यपालांनी सांगितले. महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन 2024’

अहवालामधील निष्कर्ष हे  भारतासाठी  महत्त्वपूर्ण आहेत कारण असा अंदाज आहे की एकूण जागतिक बालसंख्येपैकी 15 टक्के मुले भारतात असतील.

बालहक्कांच्या बाबतीत भारताने नक्कीच लक्षणीय प्रगती केली आहे. या मार्गावर पुढे जाण्यासाठी, आपण आरोग्य, दर्जेदार शिक्षण, कौशल्ये आणि नोकरीच्या संधींमध्ये शाश्वत बाल-केंद्रित गुंतवणूकीच्या माध्यमातून आव्हानांचा सामना केला पाहिजे. प्रत्येक मुलाला तंत्रज्ञानाचा समान प्रवेश मिळावा यासाठी डिजिटल डिव्हाईड कमी करणे आवश्यक आहे. येत्या काही दशकांमध्ये भारतातील जवळपास निम्मी लोकसंख्या शहरी भागात राहण्याचा अंदाज आहे. यासाठी बालस्नेही शाश्वत शहरी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

या अहवालामध्ये तीन मेगाट्रेंड्सद्वारे उभ्या राहिलेल्या आव्हानांना आणि संधींचा सामना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • शहरांतील मुलांसाठी शिक्षण, टिकाऊपणा आणि सेवांमध्ये गुंतवणूक करणे.
  • पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, आवश्यक सेवा आणि सामाजिक समर्थन प्रणालींमध्ये उत्तम हवामान प्रणाली (Climate Resilience ) चा विस्तार करणे.
  • सर्व मुलांसाठी कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित तंत्रज्ञानासाठी ब्लूप्रिंट प्रदान करणे.

यावेळी ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन 2024’ हा अहवाल 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिनाच्या निमित्ताने लॉन्च करण्यात आला आहे. युनिसेफ ‘लिसन टू द फ्युचर’ च्या माध्यमातून मुलांच्या आणि तरुणांच्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्याची ही संधी घेते जेणेकरून आपल्या मुलांना हवे असलेले जग आपण निर्माण करू शकू. पण, यासाठी आपल्याला आपल्या मुलांचे ऐकावे लागेल.

Web Title: Unicefs state of the worlds children report 2024 a changing worlds future is published by governor c p radhakrishnan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!
1

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.