
महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
Maharashtra Municipal Election 2026 : आतापर्यंत एंडगेममध्ये हल्क आणि टोनी स्टार्क यांना मित्र म्हणून पाहिले असेल. तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत एकमेकांना मदत करतात, परंतु त्यांच्या नात्यात तणाव आणि संघर्ष देखील दिसून येतो, विशेषतः जेव्हा हल्क नियंत्रण गमावतो तेव्हा त्यांची मैत्री गुंतागुंतीची होते. मात्र आता या दोघांची एक वेगळी बाजू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे त्यांनी आता एंडगेमवरून मुंबई आणि महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका थानोस आणि टोनी स्टार्क वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रचार करताना दिसत आहे. एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री झाली आहे, असं म्हणायला वावग ठरणार नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टोनी स्टार्क भाजपचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या प्रचारामध्ये मोठ्याने घोषणाबाजी देखील करत आहे. या व्हिडीओमध्ये टोनी स्टार्क म्हणतो की, काल रात्री हल्कने दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. हा एक एआय (Artificial Intelligence) व्हिडिओ आहे. ज्यामध्ये टोनीचा एआय पात्र म्हणतो की काल रात्री हल्कने दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे मी भाजपाकडून निवडणूक लढवत आहे. व्हिडिओत टोनी हल्कवर थेट आरोप करत म्हणतो की, मुंबई नष्ट करणे, हे हल्कचे एकच लक्ष्य आहे. माझे मात्र एकच वचन आहे, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला पुढे नेणे. यानंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘अबकी बार थानोस की हार’ अशा घोषणांचा गजर होताना दिसतो.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, हल्क शिवसेनेच्या व्यासपीठावर उभा राहून मुंबईच्या विकासाचे आश्वासन देत आहे. व्हिडिओमध्ये मुंबई बीएमसी निवडणुकीची चर्चा आहे आणि हल्क विरोधी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना दिसत आहे. त्यानंतर हल्क मुंबईच्या विकासाचे आश्वासन देतो आणि “जय हिंद, जय महाराष्ट्र” असे म्हणत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांना व्हिडिओची खूप मजा येत आहे.
shivsenahulk आणि bjptonystark नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला आधीच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी तो लाईकही केला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते व्हिडिओवर विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सने म्हटले की, “या वेळेस टोनी स्टार्कच जिंकणार! तर, दुसऱ्याने टोनीवर थेट ‘वोट चोरी’चा आरोप केला. आणखी एका युजरने हल्कचे नावच बदलून “हल्कनाथ” ठेवले.