Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: पुण्याच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा; पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी ; ‘ग्रोथ हब’ साठी ५ हजार कोटींची तरतूद

पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी एकात्मिक शहरी नियोजनावर भर देण्यात आल्याने पुण्याच्या विस्ताराला नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 02, 2026 | 09:26 AM
Union Budget 2026: पुण्याच्या आर्थिक भवितव्याला नवी दिशा; पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी ; ‘ग्रोथ हब’ साठी ५ हजार कोटींची तरतूद
Follow Us
Follow Us:
  • पुणे ग्रोथ हब’साठी पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी
  • पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ५१७ कोटी रुपयांची तरतूद
  • पुण्यात शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध
Union Budget 2026: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, ‘पुणे ग्रोथ हब’साठी पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून पुण्याला देशातील प्रमुख आर्थिक वाढीच्या केंद्रांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे.

ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान, उत्पादन, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स, संशोधन आणि सेवा क्षेत्रांना नवसंजीवनी मिळणार आहे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि कौशल्यविकास यांचा समन्वय साधत शहराची औद्योगिक क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. परिणामी, पुण्याची ओळख केवळ ‘नॉलेज सिटी’ पुरती मर्यादित न राहता मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशन हब म्हणून अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ५१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन दैनंदिन प्रवास अधिक सुलभहोण्याची अपेक्षा आहे. यासोबतच मुंबई-पुणे कॉरिडॉर तसेच मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याच्या घोषणेमुळे पुण्याची राष्ट्रीय पातळीवरील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. या कॉरिडॉर साठी 10103 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासाचा वेळ कमी झाल्यास उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला थेट लाभ होईल, असे चित्र आहे.

Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

रोजगारनिर्मितीला चालना

ग्रोथ हबअंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीमुळे थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही पातळ्यांवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्योगपूरक वातावरण तयार झाल्यास खासगी क्षेत्रातून अतिरिक्त गुंतवणूक पुण्याकडे वळण्याची शक्यता असून, याचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.

महिला, आरोग्य आणि शहरी नियोजन
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल उभारण्याच्या योजनेमुळे पुण्यात शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध होणार आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅज्युअल्टी व ट्रॉमा सेंटर उभारण्याचा निर्णयही महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पाश्र्वभूमीवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी एकात्मिक शहरी नियोजनावर भर देण्यात आल्याने पुण्याच्या विस्ताराला नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे. पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधत शाश्वत शहरी विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘पुणे ग्रोथ हब साठीची ५ हजार कोटींची तरतूद शहराच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीचा पाया मजबूत करणारी ठरणार असून, रोजगार, गुंतवणूक आणि पायाभूत विकासाच्या नव्या संधी पुण्यासाठी खुल्या होणार आहेत.

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले

माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
अर्थसंकल्यामुळे पुणे मेट्रो, पुणे ग्रोथ हब पुणे मुंबई पुणे हैदराबाद रेल्वे यामुळे पुणे आणि परिसराच्या विकासाला मोठी चालणार मिळणार आहे.

राजेश पांडे
पुणे ग्रोथ हव साठी पाच वर्षात पाच हजार कोटींचा निधी आणि पुणे मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वेमुळे पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने विकास होईल.

 

पुणे ग्रोथ हंब व हायस्पीड रेल्वेचा पुर्ण परिसराला लाभ पुणे महानगर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठीच्या ‘पुर्ण ग्रोथ हब ‘ला पाच वर्षात पाच हजार कोटीचा निधी मिळणार असून त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होईल. तसेच पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर ‘मुळे पर्यावरणपूरक, गतिमान प्रवास साध्य होईलच परंतु, या संपूर्ण पट्टयातील परिसराचा वेगाने विकास होईल. त्याचा फायदा विविध क्षेत्रांना होईल.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

● पुणे शहरासाठी केलेली ही तरतूद पुणे शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी चा प्रयत्न आहे, यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेल.
– सुनील कांबळे, आमदार पुणे कॅन्टोन्मेंट

66 पुणे ग्रोथ हब साठी 5000 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे पुण्याच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. पुण्याच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार

Web Title: Union budget 2026 a new direction for punes economic future 517 crore for pune metro 5000 crore allocated for growth hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • Pune
  • Union Budget 2026-27

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
1

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
2

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य
3

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे मोठे पाऊल! ताथवडे टप्पा-२ मधील ७९२ सदनिकांचे वितरण; लवकरच १० हजार घरे उभारण्याचे लक्ष्य

‘कॅफेच्या टेबलवर केतनच्या मर्डरचा प्लॅनिंग, हातात हात अन्…’, सिया-चेतनचा ‘तो’ Video पाहून म्हणाल, ‘काय कारस्थानी होती बाई…’
4

‘कॅफेच्या टेबलवर केतनच्या मर्डरचा प्लॅनिंग, हातात हात अन्…’, सिया-चेतनचा ‘तो’ Video पाहून म्हणाल, ‘काय कारस्थानी होती बाई…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.