Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक कोडिंग स्पर्धेत जिंकलेल्या वेदांत देवकातेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार

वेदांत देवकातने यूएसए येथील जाहिरात एजन्‍सीच्‍या कोडिंग स्‍पर्धेमध्‍ये भाग घेतला होता. त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर ४१,००० डॉलर्स (प्रतिवर्ष ३३ लाख रूपये) वेतन असलेली नोकरी सुनिश्चित केली आहे. या स्‍पर्धेत जगभरातून १००० पेक्षा अधिक कोडर्सनी सहभाग नोंदविला होता. त्याच्या या कर्तृत्वाची दखल रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी घेतली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 05, 2022 | 04:57 PM
Union Minister Nitin Gadkari felicitates Vedanta Devkate who won the World Coding Competition

Union Minister Nitin Gadkari felicitates Vedanta Devkate who won the World Coding Competition

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : नागपूर येथील इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या वेदांत देवकातने (Vedanta Devakat) यूएसए (USA) येथील जाहिरात एजन्‍सीच्‍या कोडिंग (Advertising agency coding) स्‍पर्धेमध्‍ये भाग घेतला होता. त्याने आपल्या आपल्या कौशल्याच्या जोरावर ४१,००० डॉलर्स (प्रतिवर्ष ३३ लाख रूपये) वेतन असलेली नोकरी सुनिश्चित केली आहे. या स्‍पर्धेत जगभरातून १००० पेक्षा अधिक कोडर्सनी (Coders) सहभाग नोंदविला होता. त्याच्या या कर्तृत्वाची दखल रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक समारंभ घेऊन वेदांतचा सत्‍कार केला आहे. वेदांताचा वयाचा विचार करता कंपनीने वेदांतची ऑफर मागे घेऊन, त्याला आपले कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

वेदांत हा नारायणा ई टेक्‍नो स्‍कूलमधील (Narayana E Techno School) विध्यार्थी आहे. या शाळेच्या मुख्‍याध्‍यापिका डॉ. सुलक्षणा भुयार (Principal Dr. Sulakshana Bhuyar) यांनी देखील वेदांतसह संवाद साधण्‍याकरिता माननीय मंत्री यांचे आभार मानले. त्‍या म्‍हणाल्‍या, “गडकरीजींना भेटून आम्हाला आनंद झाला. त्यांनी आमचे अभिनंदन केले आणि वेदांतला त्याची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेच्या वतीने वेदांतला त्यांच्‍या हस्‍ते लॅपटॉप भेट( laptop gift) देणे हाही आमच्यासाठी मोठा सन्मान होता. वेदांतने हे अतुलनीय यश संपादित केले हे मुख्‍याध्‍यापिका म्हणून माझ्यासाठी आणि नारायणाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप अभिमानास्पद आहे. नारायणामध्‍ये आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्‍कृष्‍टता जोपासण्‍यास प्रोत्साहित करतो आणि वेदांत हे त्याचे एक चमकदार उदाहरण आहे. ”

वेदांत पुढे म्हणाला – कोडिंग ही माझी आवड आहे, या आधी मी माझ्या आईच्या जुन्या लॅपटॉपवर कोड करायला शिकलो. आता मी यात आणखी कौशल्य मिळवू शकतो. माझ्या शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका व शिक्षकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि आता नारायणा व्यवस्थापनाने मला पुढील शिक्षणासाठी एक साधन दिले आहे.”

वेदांत वडिल राजेश देवकाते म्‍हणाले की, नारायणा व्‍यवस्‍थापनाचा गेस्‍चर पाहून ते भावूक व आनंदित झाले आहेत. ते म्‍हणाले, ”वेदांतची शाळा व शिक्षकांनी नेहमीच त्‍याला पाठिंबा दिला आहे. आजपर्यंत आम्‍हाला चिंता भेडसावत होती की, लॅपटॉपमुळे वेदांतच्‍या अभ्‍यासावर परिणाम होईल, पण आता आम्‍ही त्‍यांना ही कौशल्‍ये अधिकाधिक शिकण्‍यास प्रेरित करू.” वेदांत त्याच्या नुकत्याच मिळालेल्या यशाने खूप आनंदित आहे आणि त्याची आवड अधिक जोमाने पुढे नेण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या पालकांच्या आणि शाळेच्या पाठिंब्याने तो हे ध्‍येय निश्चित पूर्ण करेल.

Web Title: Union minister nitin gadkari felicitates vedanta devkate who won the world coding competition nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 04:57 PM

Topics:  

  • Nagpur News
  • navarashta news

संबंधित बातम्या

Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार
1

Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
2

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.