Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections: महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी; पुणे-ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश  

गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता हालचालींना गती मिळाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 11, 2025 | 12:18 PM
Local Body Elections: महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी; पुणे-ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये प्रभाग रचनेचे आदेश  
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या दिशेने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  नगरविकास विभागाने पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदर या नऊ महापालिकांमध्ये नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश संबंधित आयुक्तांना दिले आहेत. या आदेशानुसार, संबंधित महापालिकांमधील आयुक्तांनी नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे सादर करायचा आहे. यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.

याशिवाय मुंबई महापालिकेबाबत मात्र महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. महानगरपालिका निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जाणे, प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू राहणे, आणि राजकीय पक्षांमध्ये असलेली धुसफूस पाहता हा आदेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे राज्यभरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.

National Guard In America: ट्रम्प यांनी हिंसक निदर्शने दडपण्यासाठी लॉस एंजेलिसला पाठवलेले US नॅशनल गार्ड्स किती

गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता हालचालींना गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने कामाला सुरूवात केली आहे. निवडणुकीपूर्वीची महत्त्वाची पायरी म्हणून प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या सर्व ठिकाणांमध्ये आता प्रशासनाने प्रभाग रचना प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रभागांची संख्या, रचना आणि लोकसंख्येवर आधारित निकष याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral

प्रभाग रचनेच्या अहवालानंतर निवडणूक आयोग पुढील कार्यक्रम जाहीर करेल, अशी शक्यता असून, त्यामुळे लवकरच महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.

मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे, तर मुंबईत मात्र जुने 227 एकसदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेबाबत झालेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसार होणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना हे प्रभाग वाढवून 236 करण्यात आले होते. मात्र महायुती सरकार आल्यावर पुन्हा 227 प्रभाग संरचना लागू करण्यात आली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती, परंतु ती फेटाळण्यात आली, त्यामुळे आता 227 प्रभागांनुसारच मुंबईत निवडणुका होणार आहेत.

 

Web Title: Urban development department orders formation of wards in 9 municipalities including pune thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Local Body Elections

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश
1

Eknath Shinde: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; रमेश चेन्निथला यांच्यासह बड्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
2

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; रमेश चेन्निथला यांच्यासह बड्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

Raj Thackeray News: ‘बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा’; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश, मनसेचे गुप्त मिशन?
3

Raj Thackeray News: ‘बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा’; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश, मनसेचे गुप्त मिशन?

पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर
4

पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.