Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षण असलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा गोल रिंगण आणि संत तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा वाखरी येथे उत्साहात पार पडला. लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले असून आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 23, 2026 | 10:19 PM
वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन

Follow Us
Follow Us:

पंढरपूर, (वा.) आषाढी वारीतील सर्वाधिक आकर्षणाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण गुरुवारी वाखरी येथील बाजीराव विहीर परिसरात भक्तिमय वातावरणात पार पडले. याचवेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगणही उत्साहात पार पडले. लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली… माऊली’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदा रिंगण सोहळ्यासाठी नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने काही काळ नियोजनाचा ताण निर्माण झाला. ढकलाढकलीमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासन आणि सेवेकऱ्यांच्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आली.

भंडीशेगाव येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी बाजीराव विहीरकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील मुक्कामानंतर उभ्या रिंगणासाठी वाखरीत दाखल झाला. पालखी मार्गावर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यासाठी सकाळपासूनच महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश आणि देशाच्या विविध भागांतून आलेले वारकरी दिंड्यांसह बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते.

Alibag Ashadhi Ekadashi Wari: अलिबागमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ संकल्पनेतून भव्य दिंडी; पालखी सोहळ्यात विठ्ठलनामाचा गजर

हातात टाळ, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखी हरिनाम असा भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला. सायंकाळी चोपदारांनी रिंगणाची सुरुवात केली. पालखी चौथऱ्याभोवती आकर्षक रांगोळी सजविण्यात आली होती. टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, हंडेकरी, तुळशीकरी अशा मानकऱ्यांनी रिंगणस्थळाला फेऱ्या मारत वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर माऊलींची पालखी आणि मानाचा अश्व रिंगणस्थळी दाखल झाला. धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारानंतर मानाचा अश्व गोल रिंगणासाठी मैदानात सोडण्यात आला. हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात अश्वाने वेगाने रिंगण पूर्ण केले. अश्वाच्या प्रत्येक फेरीनंतर हरिनामाचा गजर अधिकच वाढत गेला. रिंगणानंतर वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर नृत्य, फुगड्या, अभंग आणि हरिपाठातून आनंद व्यक्त केला.

वाखरीच्या मुक्कामी वारकऱ्यांसह पालख्या

आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यात पंढरपूरजवळील वाखरी नगरीत गुरुवारी विविध संतांच्या पालख्यांचे आगमन झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानकाका, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांमुळे वाखरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. ग्रामस्थ, विविध संस्था आणि सेवाभावी मंडळांनी पालख्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले.

पालख्यांचे आज पंढरीकडे प्रस्थान

वाखरीतील शेवटचा मुक्काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. चंद्रभागा स्नान करून विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी वारकरी आतुर झाले आहेत. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

माऊली भेटली सोपाना; आनंद वैष्णवांना! मुख्यमंत्र्यांचा सहभाग; लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने बंधूभेट सोहळा

दर्शनासाठी २४ तास प्रतीक्षा

आषाढी एकादशीचा सोहळा शनिवारी २५ जुलै रोजी होत असून, श्री क्षेत्र पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी जमली आहे. सध्या पंढरपुरात तीन लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले असून, विठ्ठल दर्शनासाठी ३० हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे आहेत. दर्शनासाठी २४ तासांचा कालावधी लागत आहे, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. विठ्ठल दर्शनाची रांग गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत गोपाळपूरपुढील स्वेरी कॉलेजपुढे पोहोचली होती. दर्शनाचा वेग प्रति मिनिट ३२ ते ३५ भाविकांचा आहे. व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले असले तरी रांगेत घुसखोरी आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांबाबत भाविकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. प्रशासनाने आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या बुधवारी पंढरपूर तालुक्यात दाखल होणार आहेत. मंदिर परिसरातील ६५ एकर मैदानात आतापर्यंत ६५० हून दिंड्यांचे बुकिंग झाले आहे. बुधवारी एआयने दर्शनरांगेत १० हजार भाविक असल्याची नोंद केली होती. ही रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली होती.

Web Title: Vakhari gol ringan ashadhi wari pandharpur lakhs of warkaris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:19 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.