Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : घरगुती गॅसचा गैरवापर; हॉटेलमधील तिघांवर पुरवठा विभागाची कारवाई

इराण इस्त्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हा इंधन व्यापाऱ्यांना झालेला पहायला मिळत आहे. देशभरात तसंच राज्यात देखील घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने दोन वेळच्या जेवणाची सर्वात मोेठी समस्या निर्माण होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 07:48 PM
Vasai News : घरगुती गॅसचा गैरवापर; हॉटेलमधील तिघांवर पुरवठा विभागाची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
  • घरगुती गॅसचा गैरवापर;
  • हॉटेलमधील तिघांवर पुरवठा विभागाची कारवाई
वसई / निलेश महाडीक : इराण इस्त्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हा इंधन व्यापाऱ्यांना झालेला पहायला मिळत आहे. देशभरात तसंच राज्यात देखील घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने दोन वेळच्या जेवणाची सर्वात मोेठी समस्या निर्माण होत आहे. अशातच आता वसई पूर्वेतील नवजीवन परिसरात असलेल्या लजिज हॉटेलवर वसई पुरवठा विभागाने धाड टाकून कारवाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुरवठा विभागाच्या पथकाने हॉटेलवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक केला जात असल्याचे उघडकीस आले.

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा मानला जात असल्याने पुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पेट्रोलियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान फारुख अहमद खान (57), जाकीर कासम जगरार (51) आणि शरीफ मोहम्मद (48) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.दरम्यान, सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या काळात काही व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाच वर्षांनी वनराणी पुन्हा धावली! बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची सफर

सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना 70 टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय एसटी महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.

मोठी बातमी ! गॅस पुरवठा आता लवकरच सुरळीत होणार; नियमांत केला गेला ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल

Web Title: Vasai news misuse of domestic gas supply department takes action against three people in a hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Vasai news

संबंधित बातम्या

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
1

Parbhani : परभणी हिंगोलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.