Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरारमधील कागदाच्या ५० इमारतींवर घेतले कोट्यावधी रुपयांचे कर्ज, पोलीसांकडून बँका आणि पतसंस्थांची चौकशी सुरु

इमारतींचा शोध घेत असताना, त्या अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बनावट सीसी (बांधकाम परवानगी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) तयार करुन इमारत अस्तित्वात असल्याचे भासवले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 26, 2023 | 07:04 PM
विरारमधील कागदाच्या ५० इमारतींवर घेतले कोट्यावधी रुपयांचे कर्ज, पोलीसांकडून बँका आणि पतसंस्थांची चौकशी सुरु
Follow Us
Follow Us:

रविंद्र माने – वसई : बोगस कागदपत्रांद्वारे उभारण्यात आलेल्या इमारतींचे प्रकरण हाताळत असताना, कागदोपत्री ५० इमारती दाखवून त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचे प्रकरण विरार पोलीसांच्या हाती लागले आहे. वसई विरारमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे ५५ इमारती उभारण्यात आल्याचे प्रकरण विरार पोलीसांनी गेल्या महिन्यात उघड केले होते. या प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र व्हनमाने, दिलीप अडखळे, प्रशांत पाटील आणि दिलीप बेनवंशी या आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. त्यांच्या कार्यालयातून ग्रामपंचायत, सिडको, तहसिलदार, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बोगस कागदपत्रे सापडली होती. या सर्व प्रशासकिय कार्यालयांच्या परवानग्या त्यांनी स्वतःच तयार करुन त्यावर सही शिक्केही मारले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना, प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या ५० इमारती कागदोपत्री उभ्या करुन त्यावर कर्जे घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

विविध नागरिकांच्या नावे ही कर्जे फ्लॅटसाठी घेण्यात आली आहेत. त्यासाठी एका नामांकित डॉक्टरच्या रुग्णालयातील बनावट पे स्लिप ही तयार करण्यात आल्या होत्या. सदर आऱोपींनी बांधलेल्या अनधिकृत इमारतींवर गुन्हे दाखल होत असतानाच, आरोपींच्या संगणकात पोलिसांना अनेक इमारतींचा तपशील आढळला आहे. त्या इमारतींचा शोध घेत असताना, त्या अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बनावट सीसी (बांधकाम परवानगी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) तयार करुन इमारत अस्तित्वात असल्याचे भासवले. त्यानंतर या कागदांच्या इमारतींवर बनावट कागदपत्रे बनवून विविध बँकातून त्यांनी लाखो रुपयांची कर्जे घेतली आहेत. विशेष म्हणजे या कागदांच्या इमारतीत घरे घेणारे ग्राहकही कागदांचेच (अस्तित्वात नसलेले) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

इमारत आणि ग्राहक अस्तित्वात नसतानाही खात्री न करता,कागदपत्रांची तपासणी न करता आणि जागेवर जावून पडताळणी न करता ही कर्जे देण्यात आली आहेत. ही कर्जे घेण्यासाठी नामांकित डॉक्टरांच्या नावाचे ११९ बनवाट शिक्केही पोलीसांना सापडले आहेत. त्यात मुंबईतील प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ.विनोद शहा यांच्या नावाचाही शिक्का आढळला आहे. डॉ शहा यांच्या क्लिनिकमध्ये काम करीत असल्याचे भासवून, त्या कर्मचार्‍याच्या नावाने बनवाट पे स्लिप बनवून त्या आधारे बँकाकडून ही कर्जे घेण्यात आली आहेत. तसेच मुंबईतील दोन नामांकित रुग्णालयाच्या नावाने देखील बनवाट पे स्लिप बनवून लाखो रुपयांची कर्जे घेण्यात आली आहेत. या कर्जांसाठी बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्डही तयार करण्यात आली आहेत.

अनधिकृत इमारतीत राहणार्‍यांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जे घेतली आहेत. ही कर्जे कोणी आणि कशी मिळवून दिली, याचाही तपास पोलीस करीत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली जाणार आहे. डॉ.विनोद शहा यांच्या नावाचा एक शिक्का सापडल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दुजोरी दिला आहे. या प्रकरणी २३ बँका आणि काही पतसंस्थांचीही चौकशी करण्यात येत आहे. आरोपी बँकांच्या कर्मचार्‍यांना या घोटाळयात सहभागी करून घेत होते, त्यामुळे त्यांना तात्काळ लाखोंची कर्जे दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Vasai virar building virar police bogus documents palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2023 | 07:04 PM

Topics:  

  • Bogus Documents
  • palghar

संबंधित बातम्या

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
1

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
2

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
3

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
4

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.