'मातोश्री लांब राहिलं, त्याआधी आम्ही बांबू...'; वसंत मोरेंचं निशिकांत दुबेंना खुलं आव्हान
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर देशभरात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मराठीच्या अस्मितेसाठी ठाकरे बंदू एकत्र आले त्यानंतर राजकारण तापलं असून त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या बावात उडी घेते ठाकरेंवर बोचऱ्या भाषेत टीका केली. त्यावर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट हातात बांबू घेत इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राची राज्यात अंमलबजावणी करण्याचा जीआर काढला होता. पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा हा निर्णय होता. संपूर्ण महाराष्ट्रातून याला विरोध करण्यात आला. ठाकरे बंधू भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे राज्य सरकारने नमतं घेत जीआर रद्द केला. मात्र त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला आहे.
मीरा रोड येथे एका दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केला. या घटनेनंतर सुशील केडीया यांनी ” मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते बोल” असं राज ठाकरेंना आव्हान दिलं. त्यानंतर त्यांच्या मुंबईतील कंपनीची तोडफोड करण्यात आली. सुशील केडीया मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहेत.
शनिवारी वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात टीका करताना निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केलं. आपल्या घरात कुत्रेही वाघ असतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना त्यांनी दाऊद आणि मसूद अजहर सोबत केली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान दुबेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी हातात बांबू घेऊन चॅलेंज दिलं आहे. “हा फक्त बांबू नाही याआधी देखील हातोड्याचा वापर केला आहे. मारण्याची भाषा कोणी करत असाल तर याद राखा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडे जाण्याआधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावर या. मातोश्री आणि शिवतीर्थ लांबच राहिलं, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे या मग आम्हाला काय करायचं ते सांगतो. दुबे महाराष्ट्रात आल्यावर नक्की त्यांना भेटू. त्यांची नक्की मुलाखत घेऊ. दोन नेत्यांचं एकत्र येणं भाजप नेत्यांना झोंबत आहे. दुबे कितीवेळा महाराष्ट्रात आणि मुंबईत आले ? मुंबईतून येऊन बोला मग त्यांना कळेल” असं आवाहन वसंत मोरे यांनी दुबे यांना दिलं आहे. दरम्यान दुबे यांच्या वक्तव्यानंतर राजकारणातील मराठी हिंदी भाषिक वाद चिघळण्याची शक्यता आहे.